आशाताई बच्छाव
भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या वतीने पाकिस्तानच्या बिलावल भुट्टो यांचा निषेध
मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या बद्दल अपशब्द काढणाऱ्या पाकिस्तानच्या विदेश मंत्र्यांच्या विरोधात इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे निदर्शने
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
देशोधडीला लागलेले पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताचे लोकप्रिय यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यावर टीका केल्याने संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकामध्ये बिलावल भुट्टो यांच्या प्रतिमेचे दहन करून आंदोलन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष युवा ओबीसी नेते प्रणयभाऊ खुणे, नगर परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ योगिताताई पिपरे, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल भाऊ कुनघाडकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती विलासरावजी दशमुखे, , माजी नगर सेविका निमाताई उंदिरवाडे, लताताई लाटकर, महीला मोर्चाच्या शहराच्या अध्यक्षा सौ कविताताई उरकुडे, कोमलताई बारसागडे, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सागर कुंभरे, युवा नेते सोमेश्वर धकाते, कापकर, तालुक्याचे नेते देवानंद चलाख, यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पाकिस्तानच्या व पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिमेचे दहन करून जाहीर निषेध करण्यात आला.