आशाताई बच्छाव
वधु-वर परिचय मेळावे मुला-मुलींच्या विवाहासाठी उपयुक्त
माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांचे प्रतिपादन
राज्यस्तरीय तेली समाज वधु वर परिचय महा मेळाव्याला समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :-
आपल्या समाजातील उपवर- वधूंचे विवाह जोडण्यासाठी एकमेकांची ओळख व परिचय होणे आवश्यक असून अशा मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या पसंतीच्या वर -वधूंची निवड करणे सोयीचे जाते. त्यामुळे वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन नियमित होणे गरजेचे आहे . प्रत्येकच आई-वडिलांना वाटते की आपल्या मुलामुलींना चांगले वधू-वर मिळायला हवे अशा वधु- वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून चांगले स्थळ शोधण्यास मदत होते व चांगल्या स्थळासाठी इतर बाहेर फिरण्यासाठी लागणारा वेळ व त्रास कमी होतो त्यामुळे असे वधू वर परिचय मेळावे नियमित घेणे आवश्यक असून वधुवर परिचय मेळावे मुलामुलींच्या विवाहासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी वधु वर परिचय मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.
राष्ट्रीय तेली समाज मेरेज ब्युरो, आरमोरी जिल्हा गडचिरोली च्या वतीने शिवपार्वती मंगल कार्यालय, आरमोरी रोड, गडचिरोली येथे आज दि. 18 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता राज्यस्तरीय तेली समाज वधू वर परिचय मेळावा पार पडला.
कार्यक्रमाचे उदघाटन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाग्यवानजी खोब्रागडे, अध्यक्ष, किसनराव खोब्रागडे शिक्षणसंस्था आरमोरी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी येथील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.पी.आर.आकरे, बालाघाटचे राजेंद्र लटारे , चंद्रपूर चे अशोकराव मोगरे, निताताई फटींग, तेली समाजाचे नेते तुळशीदास कुनघाडकर, संताजी सोशल मंडळाचे भैय्याजी सोमनकर, प्रतिभा आकरे , प्रतिभा खोब्रागडे, तुळसीदास भुरसे, वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजक द्वारकाप्रसाद सातपुते इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे, प्राचार्य पी. आर. आकरे, राजेंद्र लटारे, भैय्याजी सोमनकर इत्यादी मान्यवरांनी समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले. परिचय मेळाव्याला गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील उपवर युवक- युवती व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.