Home परभणी वैज्ञानिक संशोधनार्थ सोडलेले फुगे जमिनीवर आल्याचे आवळ्यास प्रशासनाशी संपर्क साधावा -(महेश वडद्कर)...

वैज्ञानिक संशोधनार्थ सोडलेले फुगे जमिनीवर आल्याचे आवळ्यास प्रशासनाशी संपर्क साधावा -(महेश वडद्कर) निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परभणी.

84
0

आशाताई बच्छाव

IMG-20221122-WA0018.jpg

वैज्ञानिक संशोधनार्थ सोडलेले फुगे जमिनीवर आल्याचे आवळ्यास प्रशासनाशी संपर्क साधावा
-(महेश वडद्कर)
निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परभणी.

परभणी, दि. 25: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च हैद्राबाद या संस्थेकडून वैज्ञानिक संशोधनासाठी नोव्हेंबर 2022 ते 30 एप्रिल 2023 दरम्यान अवकाशात 10 बलून फ्लाईट्स सोडण्यात येत आहेत. या बलून्समध्ये वैज्ञानिक उपकरणे असून काही दिवसानंतर ती रंगीत पॅराशुटसह
परभणी जिल्ह्यात जमिनीवर पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या उपकरणांना स्पर्श करू नये किंवा कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये. अशी उपकरणे आढळून आल्यास जवळचे पोलीस ठाणे, टपाल कार्यालय, स्थानिक प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनास संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणाचे सचिव महेश वडदकर यांनी केले आहे.
परभणी जिल्ह्याशिवाय औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, सांगली, सातारा, अहमदनगर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, जळगाव आणि सोलापूर येथेही ही उपकरणे जमिनीवर आढळून येऊ शकतात. अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या बलून फॅसिलिटीमधून फुगे सोडले जात आहेत. हे फुगे पातळ (पॉलीथिलीन) प्लास्टिक फिल्म्सपासून बनवलेले असून 50 मीटर ते 85 मीटर व्यासाचे असतात. ते हायड्रोजन वायूने भरलेले असतात.
संशोधनासाठी वैज्ञानिक उपकरणे वाहून नेणारे फुगे, हाती घेतलेल्या प्रयोगानुसार 30 किमी ते 42 किमी दरम्यान उंची गाठतील. काही तासानंतर ही उपकरणे मोठ्या रंगीत पॅराशूटसह जमिनीवर खाली येतात. सुमारे 20 ते 40 मीटर लांबीच्या एका लांब दोरीवर, त्याच्या खाली लटकलेली उपकरणे असलेले पॅराशूट, साधारणपणे हळू हळू जमिनीवर येतात. ही उपकरणे हैदराबादपासून सुमारे 200 ते 350 किमी अंतरावर असलेल्या बिंदूंवर उतरू शकतात. विशाखापट्टणम हैदराबाद-सोलापूर मार्गावर, आंध्रप्रदेश, उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये हे बलून वाहतील.
वैज्ञानिक संशोधनासाठी ठेवण्यात आलेली उपकरणे अत्यंत संवेदनशील आहेत आणि त्यांच्याशी छेडछाड केल्यास मौल्यवान वैज्ञानिक माहिती नष्ट होईल. त्यातील काही उपकरणांवर उच्च व्होल्टेज असू शकतात, ती उघडण्याचा अथवा हाताळण्याचा प्रयत्न केल्यास धोकादायक ठरू शकतात.

ही उपकरणे जमिनीवर खाली आल्याबाबत माहिती दिल्यानंतर प्रयोग करणारे शास्त्रज्ञ उपकरणे गोळा करतील आणि या बलूनची माहिती देणा- याला योग्य बक्षीस देतील तसेच टेलिग्राम पाठवणे, दूरध्वनी करणे, माहिती पोहोचवण्यासाठी प्रवास करणे इत्यादी सर्व वाजवी खर्च देतील. मात्र उपकरणासोबत
कोणतीही छेडछाड केल्याचे आढळून आल्यास कोणतेही बक्षीस दिले जाणार नाही. परभणी जिल्हा स्थलसिमा हद्दित ही उपकरणे ज्यांना आढळून येतील त्यांनी त्वरीत जवळचे पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफीस, स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous articleलक्ष्मी टाकळी चे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन.
Next articleमहागाव (बु) येते नवीन ग्राम पंचायत भवनाची लोकार्पण सोहळा सम्पन्न..!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here