आशाताई बच्छाव
कॉलेज ला गेलेली युवती बेपत्ता
मोताळा,(संजय पन्हाळकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- खामगाव येथे कॉलेजला जाते .असे सांगून गेलेली युवती बेपत्ता झाल्याची घटना शेम्बा येथे गुरुवारी घडली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी मंगळवारी ( 8) संबधीत युवती हरवल्याची नोंद केली आहे
नांदुरा तालुक्यातील शेम्बा येथील ईश्वर सुखदेव इंगळे ( 32 ) यांनी बोराखेडी पोलिसांत फिर्याद दिली की ,त्याची मेहुनी पल्लवी गजानन तायडे ( 20 रा वतपाल टाकळी ता. नांदुरा ह.मु.शेम्बा ) ही खामगाव येथे कॉलेजला जाते असे सांगून सोमवारी ता 8 सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घरून निघून गेली. परंतु अद्यापही घरी परत आली नाही . तिच्या मैत्रिणी व नातेवाईक व आजूबाजू च्या परिसरात शोध घेतला असता ,मिळून आली नाहीं. या प्रकरणी उपरोक्त फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी संबधीत युवती हरवल्याची नोंद केली आहे पल्लवीचा रंग गोरा , उंची पाच फूट पाच इंच , शरीर बांधा मजपुत, अंगात पंजाबी ड्रेस व पायात सॅंडल घातलेली आहे