Home अकोला शोध व बचाव पथकाचे कौलखेड येथे मॉक ड्रिल

शोध व बचाव पथकाचे कौलखेड येथे मॉक ड्रिल

122
0

आशाताई बच्छाव

IMG-20221012-WA0082.jpg

शोध व बचाव पथकाचे कौलखेड येथे मॉक ड्रिल

अकोला ,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): जिल्हाधिकारी कार्यालय व एनडीआरएफ पथक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे सातत्यपुर्ण प्रशिक्षण व क्षमतावर्धनासाठी आज(दि.12) कौलखेड येथील मोर्णा नदीकाठी मॉक‍ ड्रिल व प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये पुरस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका व बचाव कार्य तसेच नागरीकांच्या बचावासाठी गेलेल्या बोटचा झालेला अपघात व त्यांचा दुसऱ्या पथकाने केलेला यशस्वी बचावाबाबत प्रात्यक्षिक व मॉक ड्रिल घेण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये शोध बचाव पथक सदस्य, पोलिस, होमगार्डचे स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, एन.एस.एस. विद्यार्थी यांनी भाग घेतला. यावेळी एन.डी.आर.एफ पथकाचे कमान्डट बिपीन बिहारी सिंग, शरद ढोरे, संजय पतले, विनोद गावंडे, प्रविण गावित यांनी 20 लोकांच्या पथकांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिक घेतले. तर मॉक ड्रिल यशस्वी करण्यासाठी संदीप साबळे, सुनिल कल्ले, हरीहर निमंकडे, सुधीर कोहचाळै, प्रा. संकेत झाल्टे, प्रशांत सायरे, अतुल वाहनखडे, सचिन चिकार, पी.एस. दामोदर, दत्तु जुमडे यांनी प्रयत्न केले.

Previous articleसंग्रामपूर तालुक्यात मिळाले चार गावांसाठी चार शिक्षक
Next article!!शांतीग्राम ता.मुलचेरा या गावातील बैठकीच्या माध्यमातून समस्या जाणून घेतल्या!!. खा.अशोकजी नेते,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here