आशाताई बच्छाव
जाहूर परिसरातील 1790 जनावरांचे लसीकरण.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील जाहूर परिसरातील दवाखान्या अंतर्गत जाहुरसह उंद्री प.दे., बिल्लाळी, तुपदाळ, भाटापूर,औराळ,लोनाळ, आदि गावातील व वाडी तांड्यावरील लंपी स्क्रीन रोगप्रतिबंधक गॉट पॅक्स लसीने गाय वर्गीय 1790 जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण पूर्ण झाले असले तरीही पशुपालकांनी गाफिल राहू नये. डास, गोचीड, माशी यापासून जनावरांना दूर ठेवावे. गोठा स्वच्छ ठेवण्यात यावा. पशूपालकांना काही अडचण आल्यास तात्काळ संपर्क साधावा. असे आवाहनही पशुधन विकास अधिकारी डॉ. परीक्षीत बिरादार यांनी केले आहे. लसीकरणासाठी डॉ. परीक्षित बिरादार साहेब, शिवाजी गायकवाड, फैयाज पाळेकर, सुनील बोडके, जनार्धन शिंदे, नागनाथ कांबळे आदींनी परिश्रम घेतले.