Home बुलढाणा स्थलांतरीत होणारी वानखेडची जगदंबा माता

स्थलांतरीत होणारी वानखेडची जगदंबा माता

81
0

आशाताई बच्छाव

IMG-20220927-WA0021.jpg

स्थलांतरीत होणारी वानखेडची जगदंबा माता

स्वप्निल देशमुख जिल्हा प्रतिनिधि बुलढाणा
देवीच्या एकाच मूर्तीची दोन मंदिरात स्थलांतराची अनोखी परंपरा येथे जोपासली जाते. नदीच्या अ‍ैल व पैल अशा दोन तिरावर या मंदिरांची स्थापना करण्यात आली

वानखेड :- देवीच्या एकाच मूर्तीची दोन मंदिरात स्थलांतराची अनोखी परंपरा येथे जोपासली जाते. नदीच्या अ‍ैल व पैल अशा दोन तिरावर या मंदिरांची स्थापना करण्यात आली आहे. या पैकी गावाबाहेरील मंदिरात जगदंबा मातेचे महिनाभरासाठी वास्तव्य राहते. तर एक महिन्यानंतर पुन्हा देवीची स्थापना नदीच्या पलिकडील तीरावर म्हणजेच गावात केली जाते. या स्थलांतराला देवीच्या सासर-माहेराची संकल्पना दिल्या जाते. ही अनोखी परंपरा येथे वर्षानुवर्षांपासून जोपासल्या जात आहे.
सातपुड्याच्या कुशीतुन उगम पावलेल्या वाननदी तिरावर संग्रामपूर तालुक्यातील वानखेड हे गाव वसले आहे. या गावाचे आराध्य दैवत असलेल्या जगदंबा मातेचे नदीच्या दोन्ही तिरावर दोन पुरातन मंदिर आहेत. यामध्ये पैलतिरावर असलेले मंदिर हे हेमाडपंथी आहे. शिवाजी महाराजांना प्रसन्न असलेल्या तुळजाभवानीची प्रतिमुर्ती येथे विराजमान आहे. मुळ पिठाच्या तिन्ही मुर्ती माता जगदंबेच्या रुपाने वानखेड येथील मंदिरात विराजमान आहेत. या मंदिरासमोर महाद्वार असून महाद्वारालगत मातेचा दुमजली रथ ठेवण्याची जागा आहे. एका आख्यायिकेनुसार देवीच्या मूर्ती या पैलतिरावरील मंदिरात होत्या. शिवकाळातील शक्ती उपासक अमृतराव देशमुख यांच्या स्वप्नात येवून प्रतिस्थापनेची आज्ञा श्री. जगदंबा मातेकडून झाली. त्यानंतर सद्यस्थित असलेल्या गावातील मंदिरात गावकºयांचे वतीने त्रयमुर्तीची पुन्हा स्थापणा, प्राण प्रतिष्ठा करण्यात आल्याचा इतिहास सर्वश्रृत आहे. वानखेड येथील जगदंबा मातेच्या मंदिरात अनेक उत्सवापैकी दोन उत्सव अति हर्षोउल्हासात साजरे करण्यात येतात. यापैकी पहिला उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव होय. संपुर्ण महाराष्ट्रातून श्रध्दाळू भावीक मातेच्या दर्शनासाठी येतात. घटस्थापनेपासून अष्टमी पर्यंत दररोज मंदिरात विविध कार्यक्रमाची रेलचेल राहते. पुर्वापार ओव्या म्हणण्याचा जुना प्रघात इथे आजतागत चालु आहे.

पौष पोर्णिमेचा महत्वाचा उत्सव
वानखेड येथील दुसरा उत्सव म्हणजे पौषपौर्णीमेचा मातेचा यात्रोत्सव. पौष पौर्णीमेला सकाळी मातेला अभिषेक आरती होवून देवीच्या मुर्तीची संपुर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक म्हणजे पालखी निघते. या पालखीच्या दर्शनासाठी हजारो भावीक वानखडे येथे येतात. याच दिवशी रात्री बारा वाजता प्रभुरायचंद्राचा रथ संपुर्ण गावातुन निघून सिताहरण, रामायण युध्द व भरतभेट असा संपुर्ण रामायणावर आधारित कार्यक़्रम सादर केला जातो. दुसºया दिवशी दहीहांडी व महाप्रसादाचा भव्य असा कार्यक्रम पुर्वापार पासून चालत आलेला आहे.

जगदंबा मातेच्या स्थलांतराची अनोखी परंपरा वानखेड येथे गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येते. महाराष्ट्रात स्थलांतराची एकमेव परंपरा वानखेड येथे सुरू आहे. गावातील नागरिकांसह महाराष्ट्रातील भाविक येथे मोठ्यासंख्येने येतात.
आनंदराव देशमुख
अध्यक्ष,जगदंबा देवी संस्थान, वानखेड.

Previous articleमाहुरची रेणूकादेवी!
Next articleकंचनपूरला राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवडा साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here