आशाताई बच्छाव
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ज्येष्ठासाठीचे कायदेविषयक शिबीर संपन्न…
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या वार्षिक सर्वसामान्य किमान कार्यक्रमातर्गत प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. ई. बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश डी.एम.जज यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाच्या सभागृहात ज्येष्ठ नागरिक यांच्या हक्काचा प्रचार प्रसार करण्याबाबतचे कायदेविषयक शिबीर संपन्न झाले.
कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश डी.एम.जज मॅडम यांच्या हस्ते झाले.
यावेळी नवीन नियुक्त झालेल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश डी.एम.जज मॅडमचे स्वागत उत्तर मराठवाडा प्रादेशिक ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने अध्यक्ष अशोक तेरकर, सचिव जयवंत सोमवाड यांच्या हस्ते तर एल्डरलाईन 14567 जनसेवा फॉउंडेशनच्या वतीने ऍड.विष्णू गोडबोले, क्षेत्रीय प्रतिनिधी पांडुरंग मामीडवार यांच्या हस्ते पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर मराठवाडा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अशोक तेरकर, ऍड. व्ही.डी.पाटनूरकर, ऍड.एम.झेड सिद्दीकी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थिताना रिटेनर लॉयर ऍड.डी.डी.डोणगावकर मॅडम यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या योजना व हक्काबाबत माहिती दिली.
तसेच मुकुंद चौधरी यांनी सामाजिक कार्य करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या तर ऍड.विष्णू गोडबोले यांनी जनसेवा फॉउंडेशनच्या वतीने राज्यात चालविण्यात येत असलेल्या एल्डर लाईन 14567 ची माहिती दिली.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश डी.एम.जज मॅडम यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या ज्येष्ठ्यांच्या समस्या समजून घेऊन उपाययोजना सुचवत अनमोल असे मार्गदर्शन करून कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार रिटेनर लॉयर ऍड. नय्युमखान पठाण यांनी केले.