आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: दसरा मेळाव्यासाठी ठाकरे विरुद्ध शिंदे गट रस्सीखेच! यावर्षी दसरा मेळाव्यासाठी रंगत पाहायला मिळणार हे नक्की. दसरा मेळाव्यासाठी पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांनी बीएमसीला अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना अजूनही परवानगी मिळाली नाही .बीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितले की गणपती मेळावा संपल्यानंतर यावरती निर्णय होईल .त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे गट यांनी देखील दसरा मेळावा घडवून आणण्यासाठी तयारी केली आहे. त्यामुळे शिंदे गटांनी सुद्धा दसरा मेळाव्यासाठी प्लॅन बी तयार केलेला आहे. एकंदरीतच शिवाजी पार्क हे मैदान कोणाला मिळणार यावरती लक्ष केंद्रित होत आहे .मुंबई बीएमसी ने सांगितले की ज्यांनी पहिल्यांदा अर्ज केला त्यांना शिवाजी पार्क मैदान मिळणार. याचाच अर्थ शिवाजी पार्क हे मैदान शिवसेना ठाकरे यांना मिळणार हे नक्की. त्यानंतर बीएमसी ने हे सांगितल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे गटांनी एम एम आर डी बीकेसी मैदानावरती दसरा मेळावा घेणार असे सांगितले. त्यासाठी शिंदे गटांनी बीकेसी मैदानासाठी अर्ज दाखल केला आहे. शिंदे गट शिवसेने मधून बाहेर पडलेल्या नेत्यांना आमंत्रण देणार असं सूत्राने सांगितले जात आहे .परंतु याचा आमंत्रण स्वीकार होईल की नाही ते येणारा काळच सांगेल. एकंदरीत काय तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिंदे गट यांच्यामध्ये दसरा मेळाव्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळते हे नक्की.