
आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: धाराशिव साखर कारखान्यावरती आयकर विभागाचा छापा संपला! धाराशिव साखर कारखाना यांच्यावरती गेली चार दिवसापासून आयकर विभागाची कारवाई सुरू होत. अभिजीत पाटील यांनी हा धाराशिव कारखाना सुरुवात केली. चार दिवसाच्या चौकशीमध्ये त्यांना काहीही सापडले नाही असे अभिजीत पाटील यांनी सांगितले. चार दिवस जवळपास १०० ते १२५ लोकांची कसून चौकशी केली. परंतु या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारची मालमत्ता त्याचबरोबर सापडलेले सोने यांच्या बद्दल कुठलाही आक्षेप घेण्यासारखे काहीही आढळले नाही. धाराशिव साखर कारखाने यांनी ७० कोटींचे कर्ज घेतले होते व त्याचे हप्ते वेळेवर चालू आहेत हे त्यांना त्या ठिकाणी माहिती झाले. थोडेफार काही त्रुटी असतील तर त्याच्यावरती अभिजीत पाटील यांनी १५ दिवसाच्या मुदतीवर या तुरटी वरती काम करू असेही सांगितले. जवळपास आयकर विभागांना १ कोटी १२ लाख रोकड सापडली. परंतु या संपूर्ण रोकड संदर्भात कुठलाही पुरावा न सापडल्यामुळे, त्याचबरोबर या संदर्भात पूर्ण माहिती दिल्यामुळे अभिजीत पाटील त्यांना ती रोकड परत करावी लागली. अभिजीत पाटलांनी माध्यमांना सांगितले की हा सर्व राजकीय षडयंत्र माझ्या विरोधकांनी माझ्या विरोधात केल्यामुळे हा आयकर विभागाचा प्रकार घडला. परंतु त्यांना एकाच सांगतो की तुम्ही एक हात आतापर्यंत दाखवला आता माझे दोन्ही हात मोकळे आहेत .हा कारखाना जर बंद पडला तर विरोधकांना किती आनंद होईल हे त्यांनी सांगितले .परंतु हा कारखाना बंद पडल्यानंतर शेतकऱ्यांचे व शेतकऱ्यांच्या उसाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असे त्यांनी सांगितले. एकंदरीत काय तर चार दिवसाच्या चौकशीनंतर आयकर विभागांना काहीही न मिळाल्यामुळे त्यांना ही कारवाई थांबवावी लागली.