आशाताई बच्छाव
नवी सांगवी येथील बाबुरावजी घोलप विद्यालय सांगवी या विद्यालयाच्या सन 1993-94 च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी होतकरू विद्यार्थ्यांना शूज चे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
आज गुरुवार दिनांक 25 ऑगस्ट 2022 रोजी विद्यालयातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शूज चे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री शिवाजी पाडुळे होते. सुमारे 20 माजी विद्यार्थी या कार्यक्रम मध्ये सहभागी झाले होते. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाळकृष्ण मापारी यांनी तर स्वागत श्री विलास निमसे यांनी केले. विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका संजना आवारी तसेच पर्यंवेक्षिका निवेदिता पोळ यांनी माजी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी विद्यार्थितानी बनवलेल्या समूह गीत संग्रहाचे माजी विद्यार्थी यांचेकडून प्रकाशन केले गेले. माजी विद्यार्थ्यांनी या वेळी विद्यालयातील 50 विद्यार्थी यांस शूजचे वितरण केले. विद्यार्थ्यांनी असे कार्यक्रम आयोजित करून मदतीचा असाच ओढा चालू ठेवावा असे विचार अध्यक्ष शिवाजी पाडुळे यांनी आपल्या भाषणात प्रतिपादन केले.अध्यक्ष निवड सुजाता चासकर यांनी केले तर अनुमोदन मनकर्णिका बोठे यांनी केले. कार्यक्रम चे संपूर्ण सूत्रसंचालन संजय मेमाणे यांनी केले. आभार चंद्रशेखर वाघमारे यांनी केले. यावेळी पुढील माजी विद्यार्थी कार्यक्रम साठी उपस्थित होते.विजय साळुंखे, गणेश बालवडकर, सचिन पवार, शिवाजी पानसरे, किरण बोरकर,शरद ढोबळे, सुनील घोडराव,संतोष देवरकोंडा, युवराज पंडीत, सचिन गायकवाड, शिवाजी नवले,राहुल कदम,रेश्मा कांबळे, ज्योती बेल्हेकर सुवर्णा शिंगाडे ,सारिका कोंढरे,राजश्री..