आशाताई बच्छाव
संजय काळे यांनी जपली सामाजिक बांधिलकी.
पेठ वडगाव राहुल शिंदे.: पारगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व यशवंत सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय काळे यांच्या वाढदिवसा निमित्य पेठवडगांव येथील बहुजण हिताय विद्यार्थी वसतिगृह येथे मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप केले.
संजय काळे हे नेहमीच समाजिक उपक्रम राबवत समाजिक बांधिलकी जपतात.यशवंत सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून करत असताना समाजाच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी शासन दरबारीं अगदी जिल्हाधिकारी यांच्या पासून ते मंत्राल्यापर्यंत यशस्वी पाठपुरावा केला आहे.दुर्गम वाड्या वस्त्यावर जाऊन तेथील अडचणी समजावून घेऊन त्याचा शासन दरबारीं पाठपुरावा करून अडचणी सोडवल्या आहेत.
मेंढपाळांच्या समस्या असतील,मेंढयाना लसी देणे ,योग्य उपचार मिळवून देणे यासाठी शासकीय पशुवैदकीय डॉक्टर उपलब्बध करून देणे यासारखी कामे केली आहेत.तसेच 2019 आणि 2021 च्या महापुरात अनेक कुटूंबांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते.अशा कुटूंबांना संसारिक मदत केली.तसेच गरजू व गुणवंत विद्यार्थीना शैक्षणिक मदत करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करत केवळ उपचाराअभावी व पैसाअभावी सर्वसामान्य व्यक्तीचा मृत्यू होऊ नये. या उद्देशाने अनेक गरजू व गरीब रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मदत मिळवून दिली आहे .वाढदिवसाच्या निमित्य बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृह पेठवडगाव अधीक्षक यांनी काळे साहेबांचे स्वागत व सत्कार करून या पुढे असेच सहकार्य करण्याचे आव्हान केले.
यावेळी उपस्तिथ सेवादीप प्रतिष्ठान इस्लामपूर चे अमोल राडे,रमेश पोवार,सुनील थोरात,प्रदीप चव्हाण,आप्पा काळे आदी उपस्थीत होते.