Home रत्नागिरी प्राथमिक शिक्षक संघाचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न

प्राथमिक शिक्षक संघाचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न

83
0

आशाताई बच्छाव

IMG-20220823-WA0096.jpg

प्राथमिक शिक्षक संघाचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न                                                 रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा – खेड यांच्यावतीने रविवार दि. 21/08/2022 रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. सर्व प्रथम अप्पा शिंदे यांनी कारगिलवीरांसाठी एक देशभक्तीपर गीत गायन केले. त्यानंतर BDS, MTS, नवोदय, मंथन, Olympiad, योगा, तायक्वादो यासारख्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थी त्याचबरोबर दहावी, बारावी, इंजिनियर, BAMS, MBBS यांचा गौरव सोहळ्याचे अध्यक्ष सत्यविजय मोरे, माजी अध्यक्ष श्री.विलास गुजर, जिल्हा सचिव दीपक मोने, चिपळूण संघाचे अध्यक्ष आशू गांधी, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष उतेकर,जिल्हा नेते प्रमोद मोहिते, माजी जिल्हा कार्याध्यक्ष जोतिबा पाटील, विस्तार अधिकारी – भोसले,श्री.मोहिते, श्री. फकीर, केंद्र प्रमुख नलावडे,श्री.डिके, तालुका नेते विलास धामणे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाचा विशेष भाग म्हणजे खेड तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचे सेवापूर्तीसाठी ऋणात्मक सत्कार करण्यात आले. सामाजिक कार्य हर घर तिरंगा – मंगेश मोरे, 19 वेळा रक्तदान करणारे राहुल तुगावकर तर 10 वेळा रक्तदान करणारे गणेश सानप, देशभक्तीपर गीत रचना प्रथम क्रमांक दादासाहेब शेख, नवनियुक्त विस्तार अधिकारी मोहिते, श्री फकीर तसेच कविता संग्रह लिहिणाऱ्या दिप्ती यादव, आदर्श पुरस्कार प्राप्त संतोष जाधव, अभिनव उपक्रम म्हणून 10 वी मध्ये प्रथम क्रमांक आलेल्या मुलीच्या हस्ते 15 ऑगस्टचे झेंडावंदन केलेल्या सवेणी नं.1 शाळेतील सर्व शिक्षकांचा, स्वच्छ विद्यालय प्राप्त लोटेमाळ शाळेचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी अखिल संघटनेचे अध्यक्ष सू. रा.पवार, समितीचे सचिव अशोक अकुस्कर, पदवीधर चे सचिव प्रशांत दळवी, जुनी पेन्शनचे सचिव गणेश सानप हे उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे शिलेदार चंद्रकांत चंदे, चंद्रकांत रेवाळे, संदीप घाणेकर, शरद कदम, अशोक मगदूम, सचिन कुडाळकर, गणोजी माने, संदीप साबळे, सुभाष बारगुडे, अनिल साळुंखे, रवींद्र पाबे इत्यादींनी विशेष कष्ट घेतले.

रांगोळी व इतर सुशोभन महिला आघाडी प्रमुख शितल देवळेकर, ऋतुजा चांदिवडे, झावरे मॅडम यांनी रेखाटून कार्यक्रमाची शोभा वाढवली. संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल अध्यक्ष चांदीवडे सर यांनी अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या तयारीसाठी कोषाध्यक्ष मंगेश झावरे, कार्याध्यक्ष सुधाकर पाष्टे, संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन करणारे तालुका सचिव एकनाथ पाटील यांनी धावपळ केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रकाश कोदारे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here