Home रत्नागिरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालगुंड ग्रामपंचायतीकडून साफसफाई मोहीम “स्वच्छ व सुंदर मालगुंड” साठी सरपंच...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालगुंड ग्रामपंचायतीकडून साफसफाई मोहीम “स्वच्छ व सुंदर मालगुंड” साठी सरपंच दीपक दुर्गुवळी यांचा पुढाकार !

115

आशाताई बच्छाव

IMG-20220823-WA0094.jpg

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालगुंड ग्रामपंचायतीकडून साफसफाई मोहीम “स्वच्छ व सुंदर मालगुंड” साठी सरपंच दीपक दुर्गुवळी यांचा पुढाकार   रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी संपूर्ण मालगुंड गाव स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी मालगुंड ग्रामपंचायतीकडून साफसफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. मालगुंडमध्ये घरोघरी येणाऱ्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मालगुंडवासीय आतुर झाले असून मुंबई व पुणे या ठिकाणाहून चाकरमान्यांचे आगमनही यंदा मोठ्या संख्येने होणार असल्याने सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे.

या अनुषंगाने मालगुंडचे सरपंच दीपक दुर्गवळी यांनी आपल्या मालगुंड ग्रामपंचायतीमार्फत गावातील मुख्य रस्त्यांची साफसफाई मोहीम हाती घेऊन मालगुंडमधील सर्व मुख्य व उपरस्ते स्वच्छ व सुंदर करून गणपती बाप्पाच्या आगमनासाठी व चाकरमान्यांच्या स्वागतासाठी आपली कार्यतत्परता दाखवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मालगुंड गाव स्वच्छ होऊन सुंदर व चकाचक दिसणार आहे.

एकूणच, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी संपूर्ण मालगुंडवासीय आतुर झाले असून मालगुंड ग्रामपंचायतीने गणेशोत्सवापूर्वी साफसफाई मोहीम हाती घेतल्याबद्दल सर्व स्थानिक ग्रामस्थ व गणेश भक्तांमधून मालगुंडचे सरपंच दीपक दुर्गवळी व ग्रामविकास अधिकारी नाथाभाऊ पाटील यांच्या स्तुत्य निर्णयाचे विशेष कौतुक होत आहे.

Previous articleमाखजन हायस्कूल, बाजारपेठत एस टी बस सेवा चालू करण्यासाठी निर्मल नारडुवे ग्रामपंचायतीकडून रस्ता साफसफाई मोहीम
Next articleप्राथमिक शिक्षक संघाचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.