Home रत्नागिरी माखजन हायस्कूल, बाजारपेठत एस टी बस सेवा चालू करण्यासाठी निर्मल नारडुवे ग्रामपंचायतीकडून...

माखजन हायस्कूल, बाजारपेठत एस टी बस सेवा चालू करण्यासाठी निर्मल नारडुवे ग्रामपंचायतीकडून रस्ता साफसफाई मोहीम

155

आशाताई बच्छाव

IMG-20220823-WA0091.jpg

माखजन हायस्कूल, बाजारपेठत एस टी बस सेवा चालू करण्यासाठी निर्मल नारडुवे ग्रामपंचायतीकडून रस्ता साफसफाई मोहीम                                               रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

येत्या काही दिवसात माखजन हायस्कूल व बाजारपेठ जाण्यासाठी एस टी बस सेवा सुरु करत आहेत संपूर्ण नारडुवे गाव स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी नारडुवे ग्रामपंचायतीकडून साफसफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या अनुषंगाने निर्मल ग्रामपंचायत नारडुवे यांनी आपल्या नारडुवे ग्रामपंचायतीमार्फत गावातील मुख्य रस्त्यांची साफसफाई मोहीम हाती घेऊन नारडुवेमधील सर्व मुख्य व उपरस्ते स्वच्छ व सुंदर करून गणपती बाप्पाच्या आगमनासाठी व चाकरमान्यांच्या स्वागतासाठी आपली कार्यतत्परता दाखवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नारडुवे गाव स्वच्छ होऊन सुंदर व चकाचक दिसणार आहे. साफसफाई मोहीम हाती घेतल्याबद्दल सर्व स्थानिक ग्रामस्थ व सुरेश जडयार व चंद्रकांत पवार यांच्या स्तुत्य श्रमदान विशेष कौतुक होत आहे.