Home मुंबई वेलकम’-‘हेराफेरी’ चित्रपटाचे निर्माते ए.जी. नाडियादवाला यांचे निधन

वेलकम’-‘हेराफेरी’ चित्रपटाचे निर्माते ए.जी. नाडियादवाला यांचे निधन

140

आशाताई बच्छाव

IMG-20220823-WA0090.jpg

‘वेलकम’-‘हेराफेरी’ चित्रपटाचे निर्माते ए.जी. नाडियादवाला यांचे निधन                                      मुंबई,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)

प्रसिद्ध वेलकम-हेरा फेरी चित्रपटाचे निर्माते अब्दुल गफ्फार नाडियादवाला यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

ए.जी. नाडियादवाला हे अनेक आजाराशी झुंज देत होते. अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा मुश्ताक नाडियादवाला यांनी संदर्भात माहिती दिली. अब्दुल गफ्फार यांनी त्यांच्या 69 वर्षांच्या कारकिर्दीत जवळपास 50 हिंदी चित्रपटांची निर्मिती केली.