आशाताई बच्छाव
पंढरपूरात चंद्रभागेची पातळी वाढली घाटापर्यंत बुडणाऱ्या महिलेला वाचविले
माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
वीर आणि उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून, चंद्रभागा नदीवर असणाऱ्या पंढरपुरातील सर्व घाटांवर पाणी आले असल्याने भाविकांनी, नागरिकांनी चंद्रभागा नदीपात्रात जाऊ नय. नागरिकांच्या व भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थानांतर्गत आवश्यक उपयोजना करण्यात आल्या तसेच सर्व घाटांवर बॅरिकेटही करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली
सलग चार दिवस शासकीय सुट्ट्या असल्याने पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत येणारे भाविक चंद्रभागा नदी स्थानासाठी व नौकाविहार करण्यासाठी जातात, चंद्रभागा नदीपात्राचे पाणी पातळी वाढ होत असल्याने तसेच नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आले आहेत भाविकांनी व नागरिकांनी सुरक्षेसाठी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे असे आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी केली आहे