
आशाताई बच्छाव
गुराखीवर वाघाने केला हल्ला,हल्यात गुराखी ठार
सीदेंवाही/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): गा्वाजवळ आपले बैल घेवून राखत असलेल्या गुराखीवर काल दिं 13 ला सांयकाळ च्या सुमारास हल्ला करुन त्या गुराखीला वाघाने उचलून नेले.शोधाशोध केली असता त्याचा आज मृत्यदेह मिळालेला आहे.त्यामुळे गावकऱ्यांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
चीकमारा येथील रामदास डुकरु नैताम वय 66 वर्ष हे नित्य नियमाने रोजच जनावरे चरायला नेतात त्याच प्रमाणे काल ही ते जनावरे चारत असतांना या परिसरात एक मोठा वाघ येऊन रामदास नैताम ला उचलुन नेला.वाघाने नेल्याची बातमी वार्यासारखी पसरताच वनविभागाला देण्यात आली व त्याचा शोध सुरू झाला.
काल रात्रो झाली म्हणून आज सकाळ पासुन शोध कार्याला सुरुवात केली असता काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळला.
वनविभागाने पंचनामा केला असुन वाघाच्या या रोजच्या दहशतीने शेतकरी व नागरिकांनमध्ये भीतिचे वातावरण पसरले आहे.