Home नांदेड जिल्हाधिकारी नांदेड द्वारा आयोजित” फ्रीडम जाॅईन रॅली” लक्षवेधी

जिल्हाधिकारी नांदेड द्वारा आयोजित” फ्रीडम जाॅईन रॅली” लक्षवेधी

139
0

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0037.jpg

जिल्हाधिकारी नांदेड द्वारा आयोजित” फ्रीडम जाॅईन रॅली” लक्षवेधी
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) जिल्हाधिकारी नांदेड च्या वतीने स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियानात “फ्रीडम जाॅईन” रॅली चे यशस्वी आयोजन लक्षवेधी ठरले.

सदर रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथून निघून, पोलीस अधीक्षक कार्यालय, कलामंदिर,शिवाजीनगर, आयटीआय , व्हीआयपी रोड मार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे पोहोचली.

सदर रॅलीच्या सुरूवातीस वंदेमातरम गीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या वतीने सादर करुन हर घर तिरंगा बाबत जनजागृती साठी चे पथनाट्य सादर करण्यात आले. पोलीसांच्या बॅंड पथकाच्या देशभक्ती पर धून ने परिसरातील सर्वांच्या मनात देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले‌. डाॅ.उद्धव भोसले कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, डॉ.विपीन इटनकर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या हस्ते रॅलीस हिरवी झेंडी दाखविण्यात आली.स्काऊट गाईड मुलींनी हर घर तिरंगा राखी मान्यवरांच्या हातावर बांधल्यानंतर कुलगुरूसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी तिरंगा ध्वज ओवाळणी म्हणून विद्यार्थीनींच्या हाती दिला.

ध्वनिक्षेपक लावलेले फिरत्या वाहनांसह नॅशनल कॅडेट कोर,स्काऊट गाईड, राष्ट्रीय सेवायोजना विद्यार्थी ,नेहरू युवा केंद्राचे विद्यार्थी ,रोलर स्केटिंग खेळाडू , माध्यमिक प्राथमिक शाळांचे बारा हजार पेक्षा अधिक विद्यार्थी तिरंगी ध्वजासह सदर रॅलीत सहभागी झाले.विद्यार्थ्यांच्या घोषणांसह NCC विद्यार्थी यांनी क्रीडा संकुल पर्यंत फडकवत नेलेला १०० फूट लांबीचा तिरंगा” हर घर तिरंगा”चा संदेश देत होता. रॅलीत ठिकाणी झालेली ललीत व प्रयोगजीवी कला संकूल विद्यापीठ मार्फत सादर पथनाट्य ,गीते व ललीत कला अकादमी नांदेड च्या वतीने सादर केलेला भारत मातेचा देखावा, व देशभक्ती पर नृत्यांनी लक्ष वेधून घेतले.

सदर रॅली जिल्हा क्रीडा संकुल येथे पोहोचल्यानंतर विद्यार्थीनी “हर घर तिरंगा व ७५” आकारात रचना करून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व हर घर तिरंगा अभियानाचा संदेश दिला. सदर रॅलीत जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी देवकुळे, तहसीलदार ज्योती चव्हाणसह इतर अधिकारी कर्मचारी व तहसील नांदेड येथील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर विद्यापीठासह अनेक महाविद्यालयीन प्राध्यापक, ललीत कला संकूल संचालक डॉ पृथ्वीराज तौर, राष्ट्रीय सेवायोजना संचालक डॉ.मल्लीकार्जून करजगी व त्यांचे सहकारी यांचे सह ५० पेक्षा अधिक शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांची उपस्थिती होती.
सात हजार पाचशे विद्यार्थी यांच्या सहभागाचे नियोजन केले असता बारा हजार पेक्षा अधिक विद्यार्थी यांच्या उत्फुर्त सहभागाने सदर रॅली लक्षवेधी, व अधिक यशस्वी झाली व तेवढीच शिस्तबद्ध होती हे विशेष.

सदर रॅली च्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली , उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी ,शिक्षणाधिकारी दिग्रसकर, गटशिक्षणाधिकारी आडे, जिल्हा क्रीडा अधिकारी मारावार, मनपा क्षेत्रिय अधिकारी चौरे, सर्व मुख्याध्यापक, प्राध्यापक,व शालेय विभागाचे माणिक भोसले,संजय भालके,प्रलोभ कुलकर्णी व तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Previous articleतेलंगणाच्या काठावर असलेल्या किनवट तालुक्यातील कोलामगुडा येथे आज घरोघरी तिरंगा चा अभिनव शुभारंभ.
Next articleभाजपाच्या तिरंगा रॅलीस नायगाव तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here