आशाताई बच्छाव
दापोलीतील ताडील येथील दत्तमंदिराचा जीर्णोद्धार रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
ओम चैतन्य दत्तगुरु मंदिर पेठमठ वाडी यांच्यावतीने ताडील येथे श्री दत्तगुरु मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा सोमवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी परमपूज्य सद्गुरू स्वामी श्री.अशोकजीनाथ महाराज यांच्या शुभहस्ते श्री दत्तगुरूंच्या मूर्तिची प्रतिष्ठापना करण्यात आली.
यानिमित्ताने सकाळी मूर्तीची मिरवणूक, प्रतिष्ठापना, पूजन, आरती, भजन उपस्थित मान्यवरांचे सत्कार व माऊलींचे मार्गदर्शन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
या कार्यक्रमाला ताडील पेठमठवाडीचे ग्रामीण मंडळाचे पदाधिकारी श्री.राजेंद्र बोथरे, श्री.संजय म्हशीलकर, श्री.महेंद्र चव्हाण, श्री.मोहन चव्हाण, श्री.दीपक चव्हाण, श्री.दीपेश चव्हाण, श्री.नैलेश चव्हाण, श्री.अमोल चव्हाण, श्री.मंगेश मोरे, श्री.संदेश सुर्वे, श्री.संतोष सुर्वे, श्री.सुचित चव्हाण, श्री.राकेश बोथरे, सौ.शेवंती सुर्वे, सौ.सुनीता चव्हाण, सौ.रेश्मा बोथरे सौ.सुरेखा कदम, सौ.दीपाली चव्हाण आदी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला पेठमठ वाडीचे माजी अध्यक्ष व विद्यमान सल्लागार श्री.दीपक चव्हाण तसेच संदीप शिंदे, संतोष बोले यांचे मोलाचे योगदान लाभले.