आशाताई बच्छाव
,!!तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे चीचडोह ब्यारेज येथे गेलेल्या शेतीचे पैसे मिळतील काय ?- !!आशीष भाऊ पिपरे नगरसेवक भाजपा न,प, चामोर्शी!!
!!खासदार अशोक भाऊ नेते यांनी भ्रमणध्वनी वर अभियंता यांच्या सोबत केली चर्चा!!
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
चामोर्शी शहरातील शेकडो शेतकरी शेतमजूर नागरिक यांची चीचडोह ब्यारेज येथे शेती गेली आहे जलसंपदा विभागाने अनेक शेतकऱ्यांचे जमिनीचे अधिग्रहण केले व अधिग्रहण केलेल्या अनेक शेतकरी शेतमजूर बांधवांचे जमिनीचे पैसे वाटप केले परंतु नगर पंचायत चामोर्शी अंतर्गत शेकडो शेतकऱ्यांचे अधिग्रहण केलेल्या जमिनीचे पैसे दिले नाहीत व प्रस्ताव सुद्धा सादर केले नाहीत या विषयावर चंद्रपूर जलसंपदा विभाग येथे शेकडो शेतकऱ्यानी वारंवार अर्ज विनंती करून सुद्धा सदर अर्ज विनंती कचऱ्याच्या पेटीत टाकण्यात आले परंतु नगर
पंचायत चामोर्शी येथील नगरसेवक आशीष भाऊ
पिपरे सदर यांनी सदर विषय अविरत लावून धरला व आज
चीचडोह ब्यारेज येथे येथील जलसंपदा विभागाचे
अभियंता कोमलवार यांचे आगमन झाले यावेळी शहरातील
ज्या शेतकरी शेतमजूर बांधवांचे
शेती ब्यारेज मधे गेले त्यांचे बेरोजगार तरुण चिरंजीव यांनी नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांच्या सोबत आज चीचडोह ब्यारेज येथे आलेले अभियंता कोमलवार यांची भेट घेतली व निवेदन दिले
यावेळी भाजपा सोशल मीडिया गडचिरोली विधानसभा पदाधिकारी रमेश अधिकारी यांनी
संबधित विषया बद्दल गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांचे बोलणे केले
व यावेळी खासदार अशोक भाऊ नेते यांनी निर्देश दिले व तत्काळ मार्गी लावण्यासाठी सांगितले यावेळी प्रामुख्याने येथील युवा तरुण बेरोजगार शेतकरी नितीन लटारे , आकाश पिपरे , प्रज्वल पिपरे , प्रणय धोडरे , निखिल धोडरे , अक्षय धोडरे , वैभव धोडरे ,व युवक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते ,