आशाताई बच्छाव
युवा मराठा न्युज तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर
अवैधरीत्या वृक्ष तोड करणाऱ्यावर कठोर कारवाई करा
रस्त्यावरील झाडावर चोरट्याचा डल्ला
सार्वजनिक बांधकाम विभागगाढ झोपेत कारवाई करणार की मॅनेज होणार
मोताळा : वृक्षवल्ली आम्हा सोयरे ही म्हण ज्या भागात वृक्ष लागवड नाही अशा ठिकाणी मनुष्य प्राण्यांना किती त्रास सहन करावा लागतेl याची जाणीव प्रत्येकाला आहेत्याच भावनेतूनशासन सातत्याने वृक्ष लागवडीचे काम करीत असते त्यासाठी लाखो रुपये खर्च करून शासन वृक्ष लागवड करीत असते मात्र दुसरीकडे त्याच झाडाची कत्तल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे .मोताळा तालुक्यातील लालमाती ते धामणगाव बढे या रोडच्या दोन्ही बाजूला 40 ते 50 वर्षांपासून चे मोठे मोठे निंबाची जुनी झाडे आहेत च्यार पाच दिवसापासून या झाडाची कत्तल केली जात असून झाडाची लाकडे सुद्धा विकल्या जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता ; अज्ञात व्यक्तीने रोडच्या दोन्ही बाजूची मोठी मोठी झाडे तोडून विकली आहेत एकी कडे ” झाडे लावा झाडे जगवा ” चा नारा देत असून वृक्ष लागवडीसाठी शासन कोटी रुपये खर्च करीत आहे मात्र कित्येक वर्ष्यापासूनचे जुनी निबाच्या झाडाची कत्तल होत असून त्याच्या मागे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असून सार्वजनिक बांधकाम विभाग ह्या चोरट्यावर कितपत कारवाई करणार .हे पाहणे आता महत्त्वाचे ठरले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एकी कडे कारवाईचे आश्वासन देतात परंतु रोडवर वाहतूक करत असताना झाडांमुळे अनेक प्रवाश्यांना आश्रय मिळतो परंतु त्याच आश्रय देणाऱ्या वृक्षाला ; रातोरात गायब केल्या जात आहे मात्र शासन दुर्लक्ष करत आहे ह्या वृक्ष तोड तोड करणाऱ्यावर शासन कितपत कारवाई करणार ह्या कडे जनतेचे लक्ष्य वेधून आहे…