
आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: काल कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले मोठे निर्णय! मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर आज कॅबिनेट मीटिंग पार पडली त्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप मोठा निर्णय घेण्यात आला. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत देणार असे शिंदे सरकारने सांगितले. दोन हेक्टरी मदत वाढवून तीन हेक्टर पर्यंत करण्यात आली आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी मदत १३६०० रुपये मिळणार आहे. मुंबई मेट्रो प्रकल्पाला १० हजार कोटी वाढीव निधी मिळणार आहे असे शिंदे सरकारने सांगितले. मेट्रो कारशेडचे काम वेगाने करण्यात येणार आहे असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मेट्रो साठी केंद्र सरकार, त्याबरोबर जायका मदत देणार आहे. मेट्रोचे काम 2023 पर्यंत पूर्ण होईल असेही फडणवीस यांनी सांगितले. कुलंब्रा, वांद्रे, सीप्झ पहिला टप्पा 2023 पर्यंत. रत्नागिरी मध्ये वैद्यकीय महाविद्यालय साठी मान्यता देण्यात आली आहे. या सर्व बाबींबाबत या बैठकीत निर्णय झाला आहे.