आशाताई बच्छाव
धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम गावापर्यंतच्या प्रत्येक घरापर्यंत तिरंगा ध्वज पोहचवा
आमदार डॉक्टर देवरावजी होळी
ध्वज विक्री केंद्र व सेल्फी पॉईंटचे आमदार महोदय यांच्या हस्ते उद्घाटन गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
पंचायत समितीच्या आवारात 75 वृक्ष लागवड करून करणार स्वातंत्र्याचा महोत्सव करणार साजरा
धानोरा पंचायत समितीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या तिरंगा प्रचार रथाला दाखविली हिरवी झेंडी
संपूर्ण देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकविण्यात येत असून आपल्या धानोरा तालुक्यातील दुर्गम अतिदुर्गम गावातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज लहरावा याकरिता योग्य ती व्यवस्था करावी असे निर्देश आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी धानोरा पंचायत समितीच्या ध्वज विक्री केंद्र व सेल्फी पॉईंटच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना दिले.
यावेळी त्यांनी पंचायत समिती धानोरा च्या वतीने तयार करण्यात आलेल्या तिरंगा प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखवून “घर घर तिरंगा” या जनजागृती अभियान मोहिमेच्या प्रचाराचा शुभारंभ केला
याप्रसंगी पंचायत समिती धानोराचे संवर्ग विकास अधिकारी टिचकुलेजी ,सह संवर्ग विकास अधिकारी अर्चना चांगले , भाजपा तालुका अध्यक्ष शशिकांतजी साळवे, जिल्हा कार्यकारणी सदस्य साईनाथजी साळवे नगरसेवक संजीव कुंडू नगरसेवक लंकेश म्हशाखेत्री, साजन गुंडावार, करीम अजानी, प्यारालाल शेंद्रे ,राकेश उईके, पंचायत समितीचे अभियंता श्री कोडापेजी प्रामुख्याने उपस्थित होते.
स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पंचायत समितीच्या आवारामध्ये ७५ वृक्ष लागवडीचा कार्यक्रमही आमदार महोदय यांच्या हस्ते करण्यात आला
धानोरा तालुक्यात अनेक अतिदुर्गम भागात गावे आहेत. या गावापर्यंत प्रामुख्याने तिरंगा ध्वज पोहोचवण्याची व्यवस्था पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फतच नाही तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी देखील ती व्यवस्था उचलण्याची आवश्यकता आहे.. दुर्गम-अति दुर्गम गावातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज कसा फडकवता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले