
आशाताई बच्छाव
!!दिभना-जेप्रा मार्गावरील रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा :!! -विलास दशमुखे,माजी उपसभापती प, स,
(मुसळधार पावसाने रस्ता गेल वाहून)
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
काही विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा मागील चार दिवसांपासून आपली संतत कोसळधार कायम ठेवली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील जनजीवन विस्कळीत होऊन अनेक रस्ते वाहून गले आहे. दरम्यान गडचिरोली मुख्यालयालगतच्या दिभना-जेप्रा या मार्गावरील रस्ता पुर्णता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने परिसरातील गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे या मार्गाची तात्काळ दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी गडचिरोली पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास दशमुखे यांनी केली आहे.
जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या 5-6 किमी अंतरावर असलेल्या दिभना-जेप्रा हा मार्ग परिसरातील गावांना मुख्यालयाशी जोडणारा मुख्य मार्ग आहे. नेहमीच या मार्गाने मोठी दळणवळण सुरु असते दरम्यान, संततधार पावसाच्या प्रवाहाने हा रस्ता वाहून गेल्याने परिसरातील गावातील नागरिकांची मुख्यालयी येण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. रस्ता वाहून गेल्याची माहिती होताच माजी उपसभपाती दशमुखे यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन रस्त्याची पाहणी केली. दरम्यान, नागरिकांची अडचण लक्षात घेता,गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते, आमदार डॉ. देवराव होळी व तहसीलदार गणवीर यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देऊन तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणीही उपसभापती विलास दशमुखे यांनी त्यांच्याकडे केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ,प्रशासनाने सदर कामाची दुरुस्ती युद्ध स्तरावर करण्याचे काम सुरू केले आहे