Home पुणे अग्रवाल समाज खडकीच्या वतीने तिज निमित्त भव्य कार्यक्रम संपन्न

अग्रवाल समाज खडकीच्या वतीने तिज निमित्त भव्य कार्यक्रम संपन्न

110

आशाताई बच्छाव

IMG-20220801-WA0044.jpg

अग्रवाल समाज खडकीच्या वतीने तिज निमित्त भव्य कार्यक्रम संपन्न

खडकी/पुणे उमेश पाटील प्रतिनिधी : अग्रवाल समाज खडकीच्या वतीने श्रावण महिन्याच्या तिज निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले. कार्यक्रमा मध्ये महिलांसाठी विविध आकर्षक स्पर्धा तसेच खेळ सादर करण्यात आल्याने महिलांमध्ये प्रचंड आनंद व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धा तसेच खेळा यामध्ये सर्व महिला आणि तरुणींना सहभागी केल्याने त्यांच्या उत्साहाचे वातावरण दिसून आले. कार्यक्रमामध्ये श्रीकृष्ण आणि राधाच्या वेशभूषा केलेल्या सर्व बालक आणि तरूणींनी सर्वांचे मन मोहुन घेतले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खडकी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगीता जाधव, अॅडव्होकेट पूजा सहारे, पत्रकार आरती मेस्त्री, भारतीय जनता पार्टीचे महिला सरचिटणीस मनिषा कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये रजनी गुप्ता यांनी विविधांगी कार्यक्रम सादर करण्यात आले. श्रावण महिन्यांवर फिल्मी गीत, मोठे मंगळसूत्र, मोठी टिकली, जास्त बांगडय़ा, मोठा टिक्का, ड्रेस कोड, श्रावण हिरवा ड्रेस, डान्स स्पर्धा, गरबा, फिल्म डान्स तसेच तंबोलाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. सर्व खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. स्पर्धेमधील विजेत्यांना सुमन अग्रवाल, आरती अग्रवाल, रिचा अग्रवाल, प्रियांका अग्रवाल, रीना गोयल, सिमा बंसल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये श्रीकृष्ण तसेच राधाचे आकर्षक पेहराव केलेल्या बालक आणि मुलीं कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजाचे अध्यक्ष दीपक अग्रवाल यांनी केले.
कार्यक्रमास अग्रवाल समाज खडकीच्या नवीन ट्रस्टींमध्ये उपाध्यक्ष पवन अग्रवाल, सचिव राहुल अग्रवाल, कोषाध्यक्ष मनीष गोयल, आरक्षण भंडार प्रमुख प्रमोद बन्सल, उत्सव प्रमुख पूर्णेश अग्रवाल, धर्मशाला प्रमुख मुकेश अग्रवाल यांची ओळख करून देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शीतल अगरवाल, दिपाली अग्रवाल, योगिता मित्तल, पूनम गोयल, मीना अग्रवाल, लीना अग्रवाल यांनी परिश्रम घेतले.

Previous articleआर्थिक दृष्ट्या अत्यंत मागासलेल्या मातंग समाजासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान १ वसतिगृह मंजूर करा
Next articleआण्णा भाऊंनी उपेक्षित लोकांचे साहित्य निर्माण केले – सतीश काळे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.