Home गडचिरोली आर्थिक दृष्ट्या अत्यंत मागासलेल्या मातंग समाजासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान १ वसतिगृह...

आर्थिक दृष्ट्या अत्यंत मागासलेल्या मातंग समाजासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान १ वसतिगृह मंजूर करा

126

आशाताई बच्छाव

IMG-20220801-WA0033.jpg

आर्थिक दृष्ट्या अत्यंत मागासलेल्या मातंग समाजासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान १ वसतिगृह मंजूर करा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी                              गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती सोहळ्यानिमित्त गोकुळनगर येथे कार्यक्रमाचे आयोजन

अनुसूचित जाती समाजातील आर्थिक दृष्ट्या अत्यंत मागासलेला हा घटक असल्याने जिल्हा केंद्रावर किमान एक वस्तीगृह मंजूर करा

कैकाडी, भंगी, मादगी, मेहतर ,मांग ,गारुडी, मारीगा मातंग या आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत मागास असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बाब म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वस्तीगृह मंजूर करून या समाजाला न्याय द्यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त आयोजित गोकुळनगर गडचिरोली येथील कार्यक्रमात केली
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वामनरावजी इंगळे, रिपब्लिकन नेते रोहिदासजी राऊत, न. प. चे माजी सभापती विजयभाऊ गोरडवार, ग्राम विस्तार अधिकारी दिगंबरची लाटलवार, सामाजिक कार्यकर्ते दीपकजी डोंगरे , माजी नगरसेविका लताताई लाटकर, सामाजिक कार्यकर्ते देवाजी लाटकर ,ज्ञानेश्वरजी बावणे, ज्ञानेश्वरजी पायघन, दीपक जाधव प्रामुख्याने उपस्थित होते

राज्यामध्ये या समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. हा समाज आर्थिक दृष्ट्या अत्यंत मागासलेला असल्याने या घटकासाठी विशेष तरतूद करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी म्हटले . या समाजाला पुढे नेण्यासाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देण्याची आवश्यकता असून शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष बाब म्हणून किमान एका वस्तीगृहाची उभारणी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा केंद्रावर किमान एक वस्तीगृह मंजूर करावा अशी मागणी त्यांनी यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे

Previous articleवाघाच्या हल्ल्यातील मृतकाच्या परिवाराला २५ लक्ष रुपयाची आर्थिक मदत करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Next articleअग्रवाल समाज खडकीच्या वतीने तिज निमित्त भव्य कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.