Home नाशिक सौ.अंजुमताई कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव नगर पालिका शाळेतील 620 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.

सौ.अंजुमताई कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव नगर पालिका शाळेतील 620 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.

119

आशाताई बच्छाव

IMG-20220801-WA0029.jpg

सौ.अंजुमताई कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव नगर पालिका शाळेतील 620 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप. नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे
या पुढे दर वर्षी १ ऑगस्ट रोजी शालेय मदत करण्याचा मानस…

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी आणि साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून सौ.अंजुम ताई कांदे यांच्या संकल्पनेतून नगर पालिकेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्याप्रयत्नातून नांदगाव व मनमाड शहरातील नगर पालिका शाळांना १० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सौ.अंजुम ताई कांदे यांनी काही महिन्यांपूर्वी या शाळांचा पाहणी दौरा केला होता या दरम्यान शाळा इमारतींची दयनीय अवस्था पाहून आमदारांना सविस्तर परिस्थिती निदर्शनात आणून दिली होती. याच वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करण्याचा निर्धार केला होता.
याप्रसंगी व्यासपीठावर सौ.अंजुमताई, कांदे, नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री,विवेक धांडे, प्रशासनाधिकारी सौ चंद्रा मोरे , उज्वला खाडे, संगीता बागुल, विद्याताई जगताप, रोहिणी मोरे, उपस्थितीत होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करत विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना सौ अंजुमताई कांदे यांनी विद्यार्थ्यांना मदत करणे संबंधि शिक्षकांना आभार व्यक्त करण्यास मनाई केली, आपण सर्व एक कुटुंब आहोत आणि कुटुंबप्रमुख या नात्याने हे आमचे कर्तव्यच आहे. आज या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात केली आहे यापुढे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तसेच शिक्षकांनाही गणवेश उपलब्ध करून देण्याबाबत चा मानस त्यांनी व्यक्त करून दाखविला. सदर उपक्रम नांदगाव व मनमाड येथे याच दिवशी दरवर्षी घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. काही महिन्यांपूर्वी शाळेचा दौरा केला त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांकडे चांगला गणवेश तसेच वही पेन नसल्याचे निदर्शनास आले म्हणूनच आज सर्व विद्यार्थ्यांना वही वाटप करण्याचे मला सौभाग्य मिळाले असे त्यांनी यावेळी सांगितले.
या वेळी जवळपास 620 विद्यार्थ्यांना जागेवरच वह्यांच्या सेट चे वाटप करण्यात आले.
मुख्याध्यापक साहेबराव घुगे , केदु जाधव, ईश्वर ठाकूर, शाहिद अख्तर, लिपिक अनिल पाटील, यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले, या वेळी नगरपालिका शाळांचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मोरे केले.

Previous articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उद्या सासवडला जाहिर सभा
Next articleतांबवे इन्स्टिट्यूट चा १०० टक्के निकाल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.