
आशाताई बच्छाव
उस्मानाबाद जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप! युवा मराठा न्यूज धाराशिव(उस्मानाबाद), जिल्हा ब्युरो चीफ श्री नागेश शिंदे. विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप समाजामध्ये जीवन जगत असताना आपणही समाजाचे काही देणे लागत असतो आणि याची परतफेड म्हणून समाजासाठी काही चांगलं कार्य करणे गरजेचे असते वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन जिल्हाध्यक्ष श्री विनायक पाटील धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुका सचिव तसेच युवा मराठा न्यूज ब्युरो चीफ श्री नागेश शिंदे सहकारी अमोल शिंदे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तामलवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी प्रहार संघटनेचे तालुका संघटक श्री सचिन शिंदे शिवसेना सोशल मीडिया प्रमुख श्री कृष्णा घोटकर व शाळेतील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होता.