Home अकोला ग्रामीण भागात लग्न करणे सोपे मात्र विवाह प्रमाणपत्र मिळणे अवघड

ग्रामीण भागात लग्न करणे सोपे मात्र विवाह प्रमाणपत्र मिळणे अवघड

125
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220604-WA0031.jpg

ग्रामीण भागात लग्न करणे सोपे मात्र विवाह प्रमाणपत्र मिळणे अवघड

विशेष प्रतिनिधी (ज्ञानेश्वर पाटील दांदळे)
बाळापुर:-अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातील काही ग्रामपंचायती अंतर्गत ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे ग्रा.पं सचिवांची मनमानी चालू असल्याचे दिसून येते विशेष म्हणजे जन्ममृत्यू नोंदणी असो किंवा विवाहनोंदणी असो याकडे वरिष्ठ स्तरावरून वेळेत नोंदणी व्हावी यासाठी वेळोवेळी सूचना आदेश सुद्धा ग्रामपंचायतला दिले जातात पण इथे मात्र ग्राम सचिवांच्या कामचुकार व मनमानीमुळे ग्रामीण भागात लग्न करणे सोपी आणि नंतर विवाह प्रमाणपत्र मिळवणे अवघड अशी परिस्थिती बाळापूर तालुक्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये पाहावयास मिळते अलीकडे अनेक ठिकाणी लग्न प्रमाणपत्राची मागणी केली जाते कायद्याच्या दृष्टीने हे प्रमाणपत्र महत्त्वाचे असते लग्न झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाकडे सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही ग्रामपंचायत सचिव हे आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून नागरिकांचा अनावश्यक खर्च वाढावा यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र जोडण्यास सांगून परत करतो वास्तविक पाहता शासकीय कार्यालय व न्यायालय यांच्यासमोर दाखल करावयाच्या व इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर असलेले मुद्रांक शुल्क माफ करणे बाबत महाराष्ट्र शासन राजपत्र भाग 4 ब अधिसूचना दिनांक 1 जुलै 2004 मंत्रालय मुंबई यांचा आदेश आहे असे असतांना देखील राजपत्रा चा अवमान करण्यात येत असून प्रतिज्ञा पत्रा करता कुठल्याही प्रकारे मुद्रांक शुल्काची आवश्यकता नाही. असे असून देखील बाळापुर तालुक्यातील बऱ्याच विभागामध्ये नागरिकांची शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र घेण्यात येतो म्हणजेच बाळापूर तालुक्यातील काही ग्रामपंचायती कडून शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रा चा अवमान करत असून “हम करे सो कायदा” अशा हुकुमशाहीचा अवलंब ग्रामपंचायत सचिवांकडून होत आहे. त्यामुळे नागरिकांना शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर प्रतिज्ञापत्र करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी चकरा माराव्या लागतात व त्याकरिता नाहक चारशे ते पाचशे रुपये खर्च होतो अशाप्रकारे गोरगरीब जनतेला ग्रामपंचायत सचिव हे आर्थिक संकटात पाडत आहेत. तरी याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राचा अवमान करणाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करावी. असे केल्यास नागरिकांची भविष्यात होणारी पिळवणूक थांबेल त्याकरिता गट विकास अधिकारी बाळापुर व विद्यमान तहसीलदार साहेब बाळापुर यांनी ग्रामीण भागाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

Previous articleस्वा.रा.ति.म. विद्यापीठाची पि.एच.डी. पदवी शेख यास्मिन असगरसाब यांना प्रदान.
Next articleजनता त्रस्त; तहसिल कार्यलय या चा कार्यभार मात्र मस्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here