राजेंद्र पाटील राऊत
अवघ्या चार दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा चिफ बीरों महादेव घोलप.
मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojana) अकराव्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या दहाव्या हप्त्याचे पैसे 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले होते. त्यावेळी देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये जमा करण्यात आले.
आता 11 वा हफ्ता कधी येणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. अवघ्या चार दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 11व्या हप्त्याचे पैसे 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात मिळण्याची घोषणा केंद्रीय कृषीमंत्र्यांनी केली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम २-२ हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
हप्ता न मिळाल्यास यावर करा संपर्क :-
पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266
पीएम किसान हेल्पलाईन नंबर:155261
पीएम किसान लँडलाईन नंबर्स: 011—23381092, 23382401
पीएम किसानचे अपडेट केलेले हेल्पलाईन नंबर: 011-24300606
पीएम किसान हेल्पलाईन: 0120-6025109
ई-मेल आयडी : pmkisan-ict@gov.in