Home कृषिसंपदा शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी बातमी, ‘या’ महिन्यात मिळणार प्रोत्साहनपर अनुदान

शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी बातमी, ‘या’ महिन्यात मिळणार प्रोत्साहनपर अनुदान

90
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220527-WA0037.jpg

शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी बातमी, ‘या’ महिन्यात मिळणार प्रोत्साहनपर अनुदान
(युवराज देवरे युवा मराठा न्यूज नेटवर्क)
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. ठाकरे सरकारने महात्मा जोतिराव फुले योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल 31 लाख 73 हजार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली. त्यानंतर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली होती.
सरकारच्या या घोषणेची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. 2017-18 पासून 2020 पर्यंत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. या नियमित कर्जदार (agri loan) शेतकऱ्यांची यादी बॅंकांनी पाठविली असून, त्यातून आता पात्र शेतकरी निवडले जात आहेत.
राज्य सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना यावर्षी जूनअखेर 10 हजार कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रुपयांचे अनुदान जमा केले जाणार आहे. राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.
भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफी दिली होती. तसेच दीड लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एकरकमी परतफेड योजनेतून (ओटीएस) कर्जमाफी देण्यात आली होती. शिवाय नियमित कर्जदारांना 25 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदानही दिले.
दरम्यान, नंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले.. या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी दीड लाखांवरुन दोन लाख रुपये केली. तसेच, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही 25 हजारांहून 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती.
दरम्यानच्या काळात महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट कोसळले.. त्यामुळे हा निर्णय लांबणीवर पडला होता. आता कोरोना संकटातून राज्य सावरले आहे.. त्यामुळे राज्य सरकार 2017-18 पासून कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देणार आहे.
या शेतकऱ्यांना वगळणार..
ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 50 हजारांपेक्षा कमी आहे, त्यांना कर्जाएवढीच रक्कम प्रोत्साहनपर अनुदान म्हणून दिली जाणार आहे.. जिल्हा मध्यवर्ती बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांनी त्यांच्याकडील नियमित कर्जदारांची यादी सहकार विभागाकडे सादर केली आहे. सध्या या यादीची छाननी सुरु आहे. आयकर भरणारे, सरकारी कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकाऱ्यांना त्यातून वगळले जाणार आहे.
पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जूनअखेर हे प्रोत्साहनपर अनुदान वर्ग केले जाण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, प्रोत्साहनपर अनुदान देताना दोन लाखांपर्यंतच्या ज्या पात्र कर्जदारांना लाभ मिळालेला नाही, त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली..
*कर्जमाफीची स्थिती**
दोन लाखांपर्यंतचे शेतकरी – 36.64 लाख
मिळालेली कर्जमाफी- 20,000 कोटी
अंदाजित नियमित कर्जदार- 23.11 लाख
प्रोत्साहनपर अनुदानाची तरतूद – 10,000 कोटी
दरम्यान, दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला.. तसेच, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा शेतकऱ्यांबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचे काय, असा प्रश्न कायम आहे..

Previous articleतेल्हारा ग्राम बाल संरक्षण समिती प्रशिक्षण कार्यशाळेत 113 अंगणवाडी सेविका व 22 पोलीस पाटील यांचा सहभाग
Next articleअवघ्या चार दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here