Home गडचिरोली ग्रामपंचायत पेंढरी येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी //

ग्रामपंचायत पेंढरी येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी //

76
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220413-WA0032.jpg

// ग्रामपंचायत पेंढरी येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी //                                                                              गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

ग्रामपंचायत कार्यालय पेंढरी येथे आज दिनांक 11 एप्रिल 2022 रोज सोमवार ला महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत पेंढरी येते महात्मा फुले यांच्या जयंती चे औचीत साधून मासिक सभा घेण्यात आली. महात्मा फुले तसेच सावित्री फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जीवनात केलेल्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच 5 टक्के अपंग निधी अंतर्गत 14अपंग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सोबत अपंगाना झोपायला गादी, उशी, बेडशीट,व डिनर सेट देण्यात आले.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2018_2019 मध्ये वयक्तिक शौचालयाचा वापर व परिसर स्वच्छत इ. वैशिष्ठ पूर्ण केल्या बद्दल गावकऱ्यांचे प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच सभेत विविध विकास कामावर चर्चा करून 15 टक्के मागासवर्गीय खर्च सन 2022-23
अंतर्गत आंतरजातीय विवाह झालेल्या जोडप्याला प्रोत्साहन पर अनुदान देण्याचे नियोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे 10 टक्के महिला व बालकल्याण खरचामधून प्रथम कन्यारत्न झालेल्या कुटुंबाला प्रोत्साहन पर अनुदान देण्याचे नियोजन करण्यात आले. सभेचे अध्यक्ष श्री. पवन व्ही.येरमे, सरपंच ग्रापंचायत पेंढरी तसेच उपस्थीत सौ. लक्ष्मिताई आतला उपसरपंच, श्री. श्रीनिवास दुल्लमवार ग्रांम. पं. सदेश्य, श्री. तृषाल येरेम ग्रां. पं. सदेश्य , श्री दुर्योधन सोनुले युवा प्रतिनिधी, सौ. चंदाताई उसेंडी ग्राम. पं. सदेस्य, कू. प्रिया दुग्गा, ग्राम. पं. कर्मचारी, श्री कुंदन मोहूर्ले, ग्राम पंचायत कर्मचारी व बहुसंख्य गावकरी मंडळी उपस्थित होते. सभा श्री. खुने साहेब, ग्राम. सेवक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here