
राजेंद्र पाटील राऊत
संगणक परिचालक संतोष महाले यांना कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी आमरण उपोषण …..
( गोपाल तिवारी ,वाशिम ) वाशिम तालुक्यातील कळंबा महाली येथील ग्रामपंचायत वर कार्यरत असलेले संगणक परिचालक संतोष रामदास महाले यांना पुन्हा कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी ४ एप्रिल पासून जिल्हा परिषद वाशिम समोर संगणक परिचालक वाशिम तालुका यांच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की वाशिम तालुक्यातील कळंबा महाली ग्रामपंचायत मध्ये अनेक वर्षापासून संगणक परिचालक संतोष रामदास महाले हे प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांनी आतापर्यंत त्यांची सर्व कामे 100% पूर्ण ऑनलाईन केलेली आहेत
त्यांना ठराव घेऊन कामावरून कमी करण्यात आले आहे संगणक परिचालक संतोष रामदास महाले यांची तालुक्यात हुशार संगणक परिचालक म्हणून ओळख आहे असे असताना सुद्धा त्यांच्या बाबतीत राजकीय दृष्ट्या सूडबुद्धीने ठराव घेऊन कामावरून कमी केले आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
संगणक परिचालक संतोष रामदास महाले यांना तात्काळ कामावर पुन्हा रुजू करावे , राजकीयदृष्ट्या सूडबुद्धीने जिल्ह्यातील संगणक परिचालक यांना कामावरून कमी करण्यात येऊ नये ,संगणक परिचालक कुठलेही शासकीय कर्मचारी नाही त्यांना इतर कामे देण्यात येऊ नये
ह्या प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
४ एप्रिल पासून संगणक परिचालक वाशिम तालुक्याच्या वतीने कामबंद चा ईशारा ही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.