• Home
  • द्राक्ष उत्पादकाला ४ लाखाचा गंडा घालून व्यापारी फरार

द्राक्ष उत्पादकाला ४ लाखाचा गंडा घालून व्यापारी फरार

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20220325-062626_Google.jpg

द्राक्ष उत्पादकाला ४ लाखाचा गंडा घालून व्यापारी फरार
पिंपळगाव बसवंतः सागर कटाळे युवा मराठा न्युज नेटवर्क चॅनेल निफाड तालुका प्रतिनिधी                               पिंपळगाव परिसरातील लोणवाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे ९० क्विंटल द्राक्ष मालाचे चार लाख, दहा हजार बुडवून कोलकाता येथील व्यापारी फरार झाला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादकांत संतापाचे वातावरण आहे. या फसवणूक प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, निफाड तालुक्यातील लोणवाडी येथील द्राक्ष उत्पादक रामदास निवृत्ती जाधव यांच्या ९०क्विंटल द्राक्ष मालाची खरेदी व्यापारी मोहम्मद रुस्तम उर्फ एम डी नवाब हल्ली रा. कोलकाता, ह. मु.मुस्लिम गल्ली पिंपळगाव बसवंत यांनी केली. मालाची रक्कम मागितली असता टाळाटाळ करत व्यापारी शहरातून फरार झाला.याबत फिर्यादी रामदास जाधव यांच्या फिर्यादीनुसार पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कुणाल सपकाळे अधिक तपास करत आहे.

anews Banner

Leave A Comment