Home नाशिक ९२ हजारांचे दागिने लंपास पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

९२ हजारांचे दागिने लंपास पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

78
0

राजेंद्र पाटील राऊत

९२ हजारांचे दागिने लंपास पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपळगाव बसवंत: सागर कटाळे युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनेल निफाड तालुका प्रतिनिधी                                     धुळे येथे मावस भावाच्या लग्नासाठी खाजगी तवेरा वाहनातून जाणाऱ्या पोलीस पत्नीच्या बॅगीतून ओझर ते शिरवाडे फाटा प्रवासा दरम्यान जवळपास ९२ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याची धक्कादायक घटना घडली. याबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हेमलता सुबोध साळवे वय २६ रा. नायगाव पोलीस हेडक्वार्टर दादर मुंबई सध्या रा.टिळक नगर ओझर नामक महिला मावस भावाचे लग्न असल्याने घरातील दागिने लाल रंगाच्या बॅगीत ठेवून आई, दोन बहिणीसमवेत आम्ही धुळे जाण्यासाठी एचएएल ओझर गेट नंबर येथून सायंकाळी ६वाजता एका खाजगी लाल रंगाच्या तवेरा वाहनास हात दाखवून बसलो, सदर वाहनात ड्रायव्हरसह तीन प्रवासी प्रवास करत होते. सदर महिला गाडीच्या मधोमध सीटवर बसून बॅग मागील बाजूंस ठेवली.धुळे जात असताना पाचोरे फाटा दरम्यान ड्रायव्हरने वाहन पार्क करून द्राक्ष खरेदी केले. त्याच्या समवेत फिर्यादी यांनी गाडीखाली उतरून द्राक्ष खरेदी केले. पुढे शिरवाडे वणी येथे वाहनचालकाने वाहन थांबवून खराब झाल्याचे सांगून फिर्यादी प्रवाश्यांना उतरवून दिले. त्यानंतर वाहन धुळ्याच्या दिशेने निघून गेले. सदर वाहनाचा नंबर एम एच ०४ डी बी २८०३ असा होता. धुळे येथे पोहचल्यावर बॅगेतील जवळपास ९२ हजारांचे दागिने लंपास झाल्याचे लक्षात आले. याबत पिंपळगाव बसवंत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अजय कवडे अधिक तपास करत आहे.सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सदर वाहनाचे फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. फुटेजवरुन वाहनाचा नंबर स्पष्ट दिसत आहे. यावरून तपास सुरू आहे. लवकरच आरोपी जेरबंद करण्यात येणार असल्याची महिती पिंपळगाव पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here