Home अकोला १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आरोग्य व शालेय शिक्षण विभागाने संयुक्त...

१२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आरोग्य व शालेय शिक्षण विभागाने संयुक्त नियोजन करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

141

राजेंद्र पाटील राऊत

१२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आरोग्य व शालेय शिक्षण विभागाने संयुक्त नियोजन करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

अकोला :(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)– जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. सध्या शासनाच्या प्राप्त निर्देशानुसार, वयवर्षे १२ ते १४ या वयोगटातील मुलामुलींच्या लसीकरणाची सुरुवात झाली आहे. या लसीकरणाला गती यावी यासाठी आरोग्य विभाग व शालेय शिक्षण विभागाने तालुका आरोग्य अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांच्या स्तरावर नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.

जिल्हा कोविड संनियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. धनंजय चिमणकर, डॉ. मनिष शर्मा, डॉ. विजय चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. वैशाली ठग तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

शासनाच्या निर्देशानुसार विविध वयोगटानुसार करावयाच्या कोविड लसीकरणासाठी जिल्ह्यात १५ लक्ष २८ हजार १५ इतके उद्दिष्ट असून आता पर्यंत पहिला डोस ११लक्ष ८९ हजार ३८३ जणांचा (७७.८४%) झाला आहे. दुसरा डोस ७ लक्ष ७७ हजार १९९ (५०.८६%) झाला आहे. तर आतापर्यंत १४ हजार ६७५ जणांचा बुस्टर डोस घेऊन झाला आहे, अशी माहिती बैठकीत सादर करण्यात आली. जिल्ह्यात लसीकरणासाठी वयोगटानुसार नियोजित लाभार्थ्यांची संख़्या या प्रमाणे आहे. १२ ते १४ वर्षे- ६१ हजार, १५ ते १७ वर्षे-९५ हजार १५, १८ ते ४४ वर्षे-८ लक्ष ८१ हजार ८००, ४५ ते ५९ वर्षे-३ लक्ष २३ हजार १००, ६० वर्षावरील २ लक्ष २८ हजार १००. लसीकरणास गती देण्यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. १२ ते १४ या वयोगटातील लाभार्थी हे शाळकरी विद्यार्थी असून शाळानिहाय तसेच त्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक लक्षात घेऊन त्यांचे लसीकरणाचे नियोजन करण्यात यावे. त्याच प्रमाणे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवांमधील शासकीय व खाजगी कर्मचाऱ्यांचे बुस्टर डोस पूर्ण करण्यात यावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी अरोरा यांनी यावेळी दिले.

Previous articleजैन महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर उद्घाटन संपन्न
Next articleअकोला (शिवर) येथे मनसे ची शिवजयंती उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.