Home मराठवाडा जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाणे जमादारास मारहाण

जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाणे जमादारास मारहाण

680
0

राजेंद्र पाटील राऊत

जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाणे जमादारास मारहाण

जिंतूर,(विष्णू डाखुरे तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाणे येथे कामावर कार्यरत असलेले ठाणे जमादार यांना मारहाण झाल्याची घटना [ता.११]फेब्रुवारी शुक्रवार रोजी दुपारी घडली आसुनषआरोपी प्रकाश साहेबराव वाकळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाणे येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून शुक्रवार [ता.११] फेब्रुवारी रोजी फिर्यादी ठाणे जमादार सतीश श्रीरंग मोरे हे ठाणे जमादार कर्तव्य निभावत असताना तक्रारदार मिलिंद चोरमारे राहणार वझर हे तक्रार घेऊन आले असता त्यांचे सोबत प्रकाश वाकळे ही आले होते. ठाणे जमादार सतीश मोरे हे तक्रारदार यांच्यासोबत विचारपूस करीत असताना एका पब्लिक एनसी चे हे प्रकरण तुम्ही कोर्टात घेऊ शकता असे ठाणे जमादार म्हणत असताना आरोपी प्रकाश वाकळे यांनी तुम्ही आम्हाला कोण सांगणार आम्हाला कळतय काय करायचे असे म्हणत ठाणे जमादार सतीश मोरे यांना शिवीगाळ करून थापड बुक्क्यांनी मारहाण करीत ठाणे जमादार यांची बक्कल नंबर ची नेमप्लेट तोडली व कॉलर पकडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. म्हणून आरोपी प्रकाश साहेबराव वाकळे यांच्याविरुद्ध ठाणे जमादार सतीश मोरे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वसंत मुळे हे करीत आहे.

Previous articleदेवळा तालुक्यात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आंदोलनाचा इशारा
Next articleवाहन चोराला पकडणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here