राजेंद्र पाटील राऊत
(भिला आहेर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा- तालुक्यातील लोहोणेर येथे प्रेम प्रकरणाच्या वादातून लग्न मोडल्याच्या संशयावरुन रावळगाव ता.मालेगाव येथिल मुलीने आपल्या कुटूंबियांच्या मदतीने मुलाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली असून तालुक्यात खळबळ उडाली.
याप्रकरणी देवळा पोलिसांनी मुलीसह आई, वडिल, व दोन भाऊ असे पाच जणांना ताब्यात घेतले आहे.दरम्यान घटनेची माहीती मिळताच माधुरी कांगणे पोलिस उपअधिक्षक नाशिक ग्रामिण, आमोल गायकवाड उपविभागिय अधिकारी कळवण यांनी घटना स्थळी भेट दीली.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की लोहोणेर येथिल युवक गोरख बच्छाव (वय ३१) हा काही वर्षापूर्वी रावळगाव ता.मालेगाव येथील युवतीच्या संपर्कात आल्याने दोघांमध्ये प्रेम संबध निर्माण झाले. मात्र युवतीच्या घरच्यांनी तीचे दुसरीकडे लग्न निश्चित करण्याच्या निर्णयास संमती दिली मात्र सदर विवाह मोडल्याने तो गोरख यानेच मोडल्याचा संशय बळावला. म्हणून त्यास लोहोणेर येथे येवून डोक्यात लोखंडी सळईने वार करुन मुलीने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने गोरख बच्छाव हा सुमारे ५५ टक्के भाजला असून त्यावर देवळा ग्रामिणरुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढिल उपच्यारर्थ नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
सदर घटनेची माहीती मिळताच पोलिस निरिक्षक दिलिप लांडगे, निलेश सवकार, सचिन भामरे, सुनिल गांगुर्डे, सुरेश कोरडे आदिंनी तात्काळ घटस्थळी धाव घेत संशयीत आरोपी मुलगी कल्याणी गोकुळ सोनवणे (वय २३) वडिल गोकुळ सोनवणे वय ५७,आई निर्मला सोनवणे वय ५२, भाऊ हेमंत सोनवणे वय३०व प्रसाद सोनवणे वय १८, यांना ताब्यात घेतले असून वरिष्ठ पोलिस अधिकारी माधुरी कांगने व उपविभागिय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक दिलिप लांडगे व सहकारी करीत आहे.