Home विदर्भ गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या नरेंद्र मोदींचा निषेध

गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या नरेंद्र मोदींचा निषेध

134

राजेंद्र पाटील राऊत

गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या नरेंद्र मोदींचा निषेध

 गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

काँग्रेस पक्षाने संपूर्ण देशामध्ये कोरोना पसरवला असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी संसदेत केले, ते अतिशय दुर्भाग्यपूर्ण असून ही बाब महाराष्ट्राचा व महाराष्ट्रातील सर्व जनेतचा घोर अपमान करणारी आहे. वास्तविक कोरोनाने सम्पूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातलेला असताना ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम घेऊन मोदींनी लाखोंची गर्दी केली आणि त्या माध्यमातून कोरोना देशात पसरवला. मोदींनी फक्त ट्रम्प चा कार्यक्रम घेण्याकरिता विमानतळ बंद केली नाहीत, कोरोनाने संकट असतांनाही बिहार, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ राज्यात निवडणूक घेण्यात आल्या. खऱ्या अर्थाने कोरोना पसरवण्याचे पाप हे मोदी सरकारनेच केले आहे. मात्र उत्तर प्रदेश मधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, स्वतःचे पाप महाराष्ट्रावर लादण्याचा केविलवाणा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वक्तव्यातून केला आहे. महाराष्ट्र व महाराष्ट्रातील जनता हे कधीही खपवून घेणार नसल्याने जिल्हा काँगेस कमिटी च्या वतीने प्रधानमंत्री मोदींच्या या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी दिनांक 9 फेब्रुवारी 2022 रोजी गडचिरोली येथे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात “शर्म करो मोदी” आंदोलन करत मोदी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, जिल्हा कार्याध्यक्ष हसनअली गिलानी, प्रदेश महासचिव डॉ. नितीन कोडवते, डॉ.चंदा कोडवते, शहर अध्यक्ष सतिश विधाते, सोशल मीडिया प्रदेश महासचिव नंदूभाऊ वाईलकर, महिला काँग्रेस अध्यक्षा रुपालिताई पंदीलवार, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, ता.अध्यक्ष नेताजी गावतुरे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, शिक्षक सेल अध्यक्ष देवाजी सोनटक्के, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, काशिनाथ भडके, अपर्णा खेवले, संजय पंदीलवार, हरबाजी मोरे, बी.आर.मुद्द्मवार, बाळासाहेब आखाडे, संजय चन्ने, समय्या पशूला, वसंत राऊत, कृष्णा झंजाळ, तौफिक शेख, चारुदत्त पोहणे, जितेंद्र मुनघाटे, आशीष कामडी, माजिद सय्यद, घनश्याम मुरवतकर, मधुकर नैताम, अनिल कोठारे, अरुण मोहोड, भरत येरने, रुपेश टिकले, ढिवरु मेश्राम, अजय भांडेकर, सुदर्शन उंदिरवाडे, नामदेव उडाण, किशोर भांडेकर, जनार्धन भांडेकर, अविनाश कुनघाडकर, संतोष गव्हारे, अब्दुल भाई पंजवाणी, फिरोज भाऊ हुद्दा, राकेश रत्नावार, वसंत सातपुते,प्रतीक बारसिंगे, समीर ताजने, जावेद खान, जीवनदास मेश्राम, मिलिंद बारसागडे, गिरीष खाडिलकर, अरुण पुण्यपरेड्डीवार, दीपक रामने, अनिल भांडेकर, मनोज वनमाळी, नरेंद्र सोरते, नदीम नाथानी, संजय वैद्य, विपुल येलेट्टीवार, कुणाल ताजने, सुनीता रायपुरे, लता ढोक, वंदना ढोके, विद्या कांबळे, आशा मेश्राम, कल्पना नंदेश्वर सह अनेक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधीकारी यावेळी उपस्थित होते.

Previous articleटेंभुर्णी येथील मोफत नेत्र तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा : निलेश ताटे
Next articleसुनिल धावडे यांचा ३५ वा वाढदिवस, मराठी शाळांमध्ये वही ,पेन भेट देण्याचा ‘छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चा’ संकल्प..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.