राजेंद्र पाटील राऊत
चंदनपुरीचा यात्रोत्सव;शासकीय आदेश किती खरा किती खोटा…!
कोरोनाची ऐसी की तैसी…!!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज)
मालेगांव– सध्या कोरोना रुग्णाची व ओमाँयक्राँन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आदेश काढून जिल्ह्यातील यात्रोत्सव बंद करीत असल्याच्या सक्त सुचना प्रशासनाला दिलेल्या असतानाही त्याला हरताळ फासून नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचा प्रकार मालेगांव जवळील श्री क्षेत्र चंदनपुरी येथे घडत असल्याचे बघावयास मिळत आहे.
उतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे चंदनपुरीतील खंडेराव महाराजांची यात्रा कोरोना महामारीमुळे सलग दोन वर्षापासून बंद असताना,काल रविवार दिनांक १६ जानेवारी व आज सोमवारी पौर्णिमेनिमित चंदनपुरीत भाविकांची उडालेली झुंबड बघता भविष्यात कोरोनाचा हाँटस्पाँट म्हणून चंदनपुरीची नोंद होऊ नये हिच अपेक्षा! चंदनपुरी ग्रामपंचायत प्रशासनाने नुकतेच आपले मत मांडताना जाहिर केले होते की,चंदनपुरीत यावर्षी देखील यात्रोत्सव रद्द केलेला असून,भाविकांनी चंदनपुरीत येऊ नये व कुठलेही धार्मिक कार्यक्रम करु नयेत अन्यथा पोलिस प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येईल असे जाहिर केलेले असतानाही,मग चंदनपुरीत रहाटगाडगे पाळणे व इतर व्यावसायिकांनी थाटलेली दुकाने नेमकी कुणाच्या परवानगीने बसविण्यात आलीत हा देखील संशोधनाचा विषय ठरत आहे.चंदनपुरीत कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाना बंदी असताना भाविकांची उडालेली झुंबड म्हणजे नेमके हे कशाचे लक्षण आहे? त्यासाठी प्रशासनाने कुठले नियम वापरलेत.एका बाजुला अंत्यविधीसाठी २० तर लग्नासाठी ५० हि मर्यादा केलेली असताना व शासकीय कार्यालयामध्ये देखील ५०/ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती जाहिर झालेली असताना,चंदनपुरी यात्रेत वाढलेल्या भाविकांच्या गर्दीला हा नियम लागू नव्हता की काय?असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.एका बाजूला ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे चंदनपुरीतील यात्रोत्सव खरोखरच बंद आहे का?चंदनपुरीत धार्मिक कार्यक्रमासाठी येणाऱ्यावर खरच बंदी आहे का?असे असेल तर मग काल व आज उडालेली अफाट गर्दी हे नेमके काय दर्शविते.याचा शोध आता प्रत्यक्ष जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनीच घेऊन चौकशी करावी अन्यथा भविष्यात कोरोना महामारीचा मोठा स्फोट झालाच तर त्याचा हाँटस्पाँट चंदनपुरी ठरेल व प्रशासनासह शासनाची भंबेरी उडून मग खरी कसोटी लागेल हे मात्र तेवढेच खरे!