राजेंद्र पाटील राऊत
बंगाली समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध-
खासदार अशोक नेते यांचे सुभाषग्राम येथील बंगाली समाजाचे बैठकीत प्रतिपादन
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
बंगाली समाज 40 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात वहिवाट करीत आहे मात्र त्यांना वनजमिनीचे पट्टे देतांना 75 वर्षाची अट घातलेली आहे. तसेच अन्य कागदपत्रे घेतांनाही त्यांना अनेक अडचणी येत आहेत. यात तोडगा काढण्यासाठी आपण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू व बंगाली बांधवांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांनी केले. चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथे आयोजित बंगाली समाजाच्या छोटेखानी बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे आदिवासी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम म्हणाले मा.पालकमंत्री व राज्यमंत्री राजे अम्ब्ररीशराव जी आत्राम व खा. अशोक जी नेते साहेब यांच्या नेत्रुत्वात मुलचेरा येथील 23,चामोर्शी येथील 23 व आरमोरी तालुक्यातील 2 अश्या 48 गावांतील बंगाली समाजाच्या घराचे मोजमाप करुन प्रापर्टि कार्ड देउन बंगाली समाजाला न्याय दिला आहे जो न्याय 1960 पासुन काॅग्रेस सरकारने बंगाली समाजाला न्याय दिला नाही .1991 मध्ये बंगाली समाजाला विश्वासात न घेता ते राहत व कसत असलेली महसुलची जमीन वन विभागात कनवर्ट केली व 2006 ला वनहक्क जमीनीचे पट्टे देण्या बाबत कायदा करताना काॅग्रेस सरकारने 1964 ला आलेल्या बंगाली समाजालाही 75 वर्षाची अट लावली म्हणून अतिक्रमीत वनजमीचे पट्टे बंगाली समाजाला मिडत नाहि.मा.खासदार अशोक जी नेते यानी लोकसभेत 75 वर्षाची अट शितील बाबत प्रश्न उपस्थित केला आहे. हा प्रश्न मार्गी लागला तर ओबिसी,एस.सी.बंगाली सर्व समाजाला न्याय मिळेल. यावेळी प्रमुख पाहूने म्हनुन् जिल्हा भाजपा महामंत्री रवींद्र ओलालवार, भाजयुमो चे प्रदेश सदस्य स्वप्निल वरघंटे, अखिल भारतीय बंगाली समाजाचे अध्यक्ष दिपकजी हलधर, इंदिरा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य बेपारी, चामोशी तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, माजी उपसभापती आकुलीताई बिश्वास, सतीश राय, व बंगाली समाज बांधव उपस्थित होते.