राजेंद्र पाटील राऊत
छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावंगी ( भांबळे ) येथे १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण संपन्न . जिंतूर,(विष्णू डाखुरे तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
छ शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावंगी भांबळे ता जिंतूर येथे १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोवीड लसीकरण दिनांक ६ जानेवारी रोजी यशस्वीरित्या संपन्न झाले .
यावेळी एकून १८४ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली . तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिनेश ‘बोराळकर , वैदयकिय अधिकारी डॉ अक्षय भिसे यांच्या मार्गदर्शनानुसार वझर ( बु ) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी डॉ एकनाथ मुटकुळे , डॉ सागर कांगणे , डॉ अमित वांझोळकर , आरोग्य सेवीका मंगल कऱ्हाळे , रिना वहाने , शेख रोशन बी यांनी लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी अथक परीश्रम घेतले .
यावेळी शाळेचे प्राचार्य श्री जी आर पवार सर यांच्या प्रमुख उपस्थीतीत लसीकरणास सुरुवात झाली .
लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी ताठे एस एम , ठोके बी एस , पवार व्ही पी , कापुरे एस जे , पडघान टी आर , खोब्रागडे के जे , घुगे एम डी , धुमाळ जे डी , चोपडे जी एस , राठोड डी एन , कुरई एन आर आदींनी विशेष सहकार्य करून लसीकरण मोहीम यशस्वी केली .