राजेंद्र पाटील राऊत
बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिवीर संगोळी रायन्ना पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. यासाठी देण्यात आली निवेदन.
गुलबर्गा जिल्हा प्रतिनिधी यशवंतराव सूर्यवंशी
कर्नाटक राज्याची राजधानी बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली. समाजात तेढ निर्माण व्हावी, समाजामध्ये अशांतता निर्माण व्हावी या उद्देशाने काही समाजकंटकांनी असे कृत्य केले असून अशा या भ्याड कृत्याचा निषेध कर्नाटक क्षेत्रीय मराठा परिषद बेंगलोर,यांचे राज्य उपाध्यक्ष श्री सूर्यकांत कदम, गुलबर्गा जिल्हा मराठा क्षेत्रीय परिषद, गौरव अध्यक्ष श्री दिनकर मोरे, जिल्हाध्यक्ष रामचंद्र जगदाळे, जनरल सेक्रेटरी राजू काकडे, दिलीप पवार, यशवंतराव सूर्यवंशी, श्रीकांत जाधव, सहदेव भोसले, कैलास मोरे, रवी वाडेकर, रमेश चीचकोटे, भिमराज वाघमारे, अनिल मोरे, अभिनय फाळके, गुंडप्पा कोडली, सह मल्लिकार्जुन यांनी बेंगलोर येथे झालेल्या महापुरुषांच्या विटंबनेचा जोरदार निषेध करत गुलबर्गा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना निवेदन देऊन या विटंबनेत सामील होणाऱ्या समाजकंटकांचा विरुद्ध कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली.