राजेंद्र पाटील राऊत
वाशीम ( गोपाल तिवारी ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
वाशीम तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या अनसिंग शहरातल्या सराफा मार्केटमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न दरोेडेखोरानी केला परंतू परिसरातील एका नागरिकाच्या जागरुकपणामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला. अनसिंग येथे शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. या परिसरात राहणाऱ्या गजानन ढोके यांना खडखड असा आवाज आला तसेच त्यांचे कुत्रे सुध्दा भुंकत असल्याने त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता त्यांना मा दुर्गा ज्वेलर्स हे दुकान फोडून त्या दुकानाच्या जवळ ५ ते ६ दरोडेखोर असल्याचे दिसले त्यांनी त्या लोकांना आवाज देऊन विचारणा केली असता ते दरोडेखोर काही अंतरावर उभ्या असलेल्या एका क्रुझर गाडी मध्येबसून फरार झाले. नंतर सराफा व्यवसायीकाना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटना स्थळ घाटून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सुध्दा घटनेचे गांभीर्य पाहून त्या अज्ञात दरोडेखोरांचा तपास सुरू केला. अनसिंग पोलीस ठाण्याच्या फौजदार नयना पोहेकर व त्यांचे सहकारी त्या अज्ञात दरोडेखोरांना ताब्यात घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.(उद्या अवश्य बघा व्हिडीओ न्युज -वाशिम)