Home विदर्भ मनसेचे बसस्थानकासमोर निदर्शने व धरणे आंदोलन कामगारांच्या मागण्या पुर्ण न झाल्यास भव्य...

मनसेचे बसस्थानकासमोर निदर्शने व धरणे आंदोलन कामगारांच्या मागण्या पुर्ण न झाल्यास भव्य मोर्चा – मनिष डांगे

175

राजेंद्र पाटील राऊत

देवेंद्र सुरेश कलकोट
वाशीम तालुका प्रतिनिधी
युवा मराठा न्यूज

मनसेचे बसस्थानकासमोर निदर्शने व धरणे आंदोलन
कामगारांच्या मागण्या पुर्ण न झाल्यास भव्य मोर्चा – मनिष डांगे

वाशिम – राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून सुरु असलेल्या एस.टी. कर्मचार्‍यांच्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात रविवार, १९ डिसेंबर रोजी स्थानिक बसस्थानकासमोर तीव्र निदर्शने व धरणे आंदोलन राबविण्यात आले. शासनाने कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास भव्य मुक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांनी एसटी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे. अर्धनग्न मोर्चाची परवानगी नाकारल्यामुळे धरणे आंदोलन राबविण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान एस.टी. संपामध्ये बळी गेलेल्या ५४ एस.टी. कामगारांना दोन मिनीटे मौन पाळून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, एस. टी. कर्मचार्‍यांच्या विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी गेल्या दीड महिन्यापासून संप असून या संपादरम्यान शासनाने कित्येक कर्मचार्‍यांना सेवेतून निलंबित केले आहे. एस. टी. कर्मचारी संघटनाच्या मागण्यांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला संपूर्ण पाठींबा जाहीर केला असून मनसेच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात काळ्या पट्ट्या बांधून, जिल्हाधिकारी कार्यालयावर ढोले, डफडे वाजून शासनाचे लक्ष वेधले आहे. परंतु शासनाने मनसेच्या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे एस. टी. कर्मचार्‍यांच्या मागण्यांची त्वरित पूर्तता करून एस. टी. सेवा पुर्ववत सुरु करावी अशी मनसेची मागणी आहे. शासनाने कामगारांना न्याय न दिल्यास यापुढे भव्य मुक मोर्चा काढण्यात येईल असा इशाना मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
या आंदोलनात महाराष्ट्र सैनिक कृष्णा इंगळे, मोहन कोल्हे, गजानन वैरागडे, मनोज राऊत, यश चव्हाण, पवन डुबे, प्रतिक कांबळे, प्रकाश कवडे, रघुनाथ खुपसे, योगेश भोयर, विनोद सावके, उमेश टोलमारे, नितेश खडसे, शिवराज टोलमारे, महिला सेनेच्या सौ. बेबी धुळधुळे, सिता धंदरे, वंदना अक्कर, वनिता पांडे यांच्यासह एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous articleकर्नाटक घटनेच्या निषेधार्थ उद्या तळवाडे गाव बंद
Next articleअनसिंग शहरात दरोडयाचा प्रयत्न असफल ठरला;पोलिसांचे नागरिकांना दक्ष व जागृत राहण्याचे आवाहन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.