राजेंद्र पाटील राऊत
भाजप सर्व समाजाला न्याय देऊ शकत नसल्यामुळे पदाचा राजीनामा – प्रताप देशमुख
जिंतूर मध्ये भाजपला मोठा फटका
जिंतूर (विष्णू डाखुरे तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- भारतीय जनता पार्टीच्या जिंतूर मंडळ अध्यक्ष आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रताप विनायकराव देशमुख यांनी जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे ई-मेल द्वारे पाठविला आहे. मागील दोन वर्षापासून मी भारतीय जनता पार्टी तालुका जिंतूर प्राथमिक सदस्य व मंडळ अध्यक्ष असून सदस्य झाल्यापासून माझे विचारसरणी व पक्षाची विचारसरणी जुळत नाही
पुढील कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश घ्यायचे हे जिंतूर शहर तालुक्यातील माझे सर्व कार्यकर्त्यांची येत्या दोन-तीन दिवसांत बैठक घेऊन कार्यकर्त्याचे विचार व चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे बोलताना सांगितले
-प्रताप देशमुख
मी एक धर्मनिरपेक्ष
कुटुंबातुन पुढे आलेलो व्यक्ती
आहे. भाजपा पक्ष हा ओ.बी.
सी., मागासवर्गीय आणि
अल्पसंख्याक समाजाला
न्याय देऊ शकत नाही अशी
माझी धारणा झाली आहे व
तसेच अनुभव या दोन वर्षात
मिळाले आहेत.त्यामुळे पक्षात
माझ्या मनाची घुसमट होत
आहे. करिता आज मी भाजपा
पक्षाचा प्राथमिक सदस्य व
जिंतूर तालुका मंडळ अध्यक्ष
पदाचा राजीनामा देत आहे.
माझा राजीनामा जिल्हाध्यक्ष
यांनी स्वीकार करावा या
राजीनाम्यामुळे राजकीय
वर्तुळात खळबळ माजली
असून जिंतूर शहरात होणाऱ्या
नगरपालिका
निवडणुकीत मुस्लिम मतदान
लक्षात ठेवत भाजप ला
सोड चिठ्ठी दिली अशी चर्चा
असून भविष्यामध्ये प्रताप
देशमुख कोणत्या पक्षात
जाणार हे अद्यापि स्पष्ट
झाले नसल्याने या विषयी
उलट सुलट चर्चा होत आहे.