राजेंद्र पाटील राऊत
उमरदरीवाडी येथे श्री हनुमान मंदिर कलशारोहन व सप्ताहाताची सांगता
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका शहर प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील उमरदरीवाडी येथे श्री हाणुमान मंदिर कलशारोहन व
सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित केला होता दि १८ ते २०डिसेंबरपर्यंतआयोजित करण्यात आला होता सप्ताहातील कीर्तन सेवा श्री ह भ प भगवान महाराज माहाळगीकर श्री ह भ प राजेश महाराज पाटील गुंजरगा श्री ह भ प
गुरुराज महाराज देगलूरकर कीर्तन सेवा झाली कलश व पालखी मिरवणूक काढण्यात आली व गणाचार्य मठ संस्थान मुखेडचे श्री ष ब्र १०८डाॅ विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते कलशारोहणयांचा झाला श्री ह भ प
गुरुराज महाराज देगलूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने कार्यक्रम संपन्न झाला