Home पश्चिम महाराष्ट्र सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकाल : खटाव तालुक्यात श्री. प्रभाकर घार्गे...

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकाल : खटाव तालुक्यात श्री. प्रभाकर घार्गे विजयी : तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का

397

राजेंद्र पाटील राऊत

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकाल : खटाव तालुक्यात श्री. प्रभाकर घार्गे विजयी : तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का

ठाणे ( अंकुश पवार, सहसंपादक,ठाणे ,युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत धक्कादायक निकालाची मालिका सुरु आहे. आजी-माजी मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बंडखोरी करत घार्गे यांनी अर्ज सादर केला होता. तरुंगातून निवडणूक लढवत प्रभाकर घार्गे यांनी विजय मिळवलाय. प्रभाकर घार्गे यांचा 10 मतांनी विजय झालाय. या सातारा जिल्हा बँक निवडणुकीत शशीकांत शिंदे आणि शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसलाय. अजित पवार आणि गायत्रीदेवी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे नंदकुमार मोरे यांचा घार्गे यांनी पराभव केला. नंदकुमार मोरेंना 46 मते तर प्रभाकर घार्गे 56 मते मिळाली आहे. प्रभाकर घार्गे यांचा 10 मतांनी विजय झालाय. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 21 पैकी 11 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे 10 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यात 1964 मतदारांपैकी 1892 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 96.33 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान जावळी आणि खटाव सोसायटीसाठी झाले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक खूपच चुरशीची लढत झाली होते. अगदी आमदार साहेबांनी सुधा आपली ताकद पणाला लावली होती. परंतु खटाव तालुक्यातील औंध पळशी गावचे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक
पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या जिल्हा बँकांच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे जाणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. अशातच साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

जावळी आणि पाटण येथून या ठिकाणी जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा तर पाटण विकास सेवा सोसायटी गटातून शिवसेना उमेदवार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना पराभवाचा धक्का बसला आहे

शशिकांत शिंदे, शंभूराज देसाई पराभूत; सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकाल अनेकांसाठी धक्कादाय
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकाल जाहीर झाला आहे. काही ठिकाणी अपेक्षीत तर काही ठिकाणी अनपेक्षीत निकाल पाहायला मिळत आहे. सर्वात धक्कादायक निकाल लागला आहे, जावळी आणि पाटण येथून.
या ठिकाणी जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा तर पाटण विकास सेवा सोसायटी गटातून शिवसेना उमेदवार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मात्र विजयी बाजी मारली आहे.सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत 21 जागांसाठी लढत झाली. दरम्यान, 21 पैकी 11 जागा आगोदरच बिनविरोध झाल्या. त्यामुळे उर्वरीत 10 जागांसाठी मतदान झाले. यात आतापर्यंत हाती आलेल्या मतमोजणी निकालानुसार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे.

शिंदे यांच्या विरोधात ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली. तर शंभूराज देसाई यांना पारंपरीक प्रतिस्पर्धी सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. विलासकाका उंडाळकर यांचे काँग्रेसवासी पुत्र उदयसिंह उंडाळकर यांचा कराड सोसायटी गटातून पराभव झाला. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी हे या ठिकाणी विजयी झाले. त्यांनी उंडाळकरांचा पराभव केला.

जाणून घ्या निकाल, उमेदवारांना मिळालेली एकूण मते

जावली सोसायटी गट-

एकूण मते- 49

ज्ञानदेव रांजणे – 25 (विजयी)

शशिकांत शिंदे – 24 (पराभूत)

पाटण विकास सेवा सोसायटी गट-

सत्यजित पाटणकर – 58 (विजयी)

शंभूराजे देसाई – 44 (पराभूत)

कराड सोसायटी गट –

बाळासाहेब पाटील – 74 (विजयी)

उदयसिंह उंडाळकर पाटील – 66 (पराभूत)

कोरेगाव-

शिवाजीराव महाडीक-45 (समान मते)

सुनील खत्री-45 (समान मते)

खाटाव-

प्रभाकर घार्गे-56 (विजयी)

नंदकुमार मोरे-46 (पराभूत)

माण-

शेखर गोरे-36 (समान मते)

मनोजकुमार पोळ-36 (समान मते)

नागरी बँक/नागरी सहकारी बँक

रामराव लेंभे-307 (विजयी)

सुनील जाधव-47 (पराभूत)

इतर मागासवर्गीय सदस्य

शेखर गोरे-379 (पराभूत)

प्रदीप विधाते-1459 (विजयी)

राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील मध्यवर्ती बँक म्हणजे प्रत्येकाच्या उत्सुकतेचा विषय. ग्रामीण आणि शेतकरी वर्गाशी थेट नाळ जोडल्याने तळागाळात या बँकांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष असते. सहाजिकच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीकडेही हे लक्ष होते. आज सकाळी आठ वाजलेपासूनच मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली. मतमोजणी कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावी यासाठी सर्व यंत्रणा सज्ज होती. पोलीस बंदोबस्तही चौख तैनात होता.

Previous articleईशान ने नांदेड जिल्ह्याचे नांव आंतरराष्ट्रीय स्तरावर कमावले मि सदैव सोबत. खा.प्रतापराव पाटील चिखलीकर.
Next articleमहाराष्ट्र भूषण भारुड सम्राट योगेश चिकटगावकर यांची जन्मभूमीला भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.