Home मुंबई एसटी कर्मचाऱ्यांसाठी “ईकडे आड, तिकडे विहीर” परिवहन मंत्री यांनी ३७६ कामगारांना निलंबीत...

एसटी कर्मचाऱ्यांसाठी “ईकडे आड, तिकडे विहीर” परिवहन मंत्री यांनी ३७६ कामगारांना निलंबीत केले.. दुसरीकडे संपाविरुद्ध आता न्यायालयात अवमान याचिकेवर सोमवारी सुनावणी…?

128
0

राजेंद्र पाटील राऊत

एसटी कर्मचाऱ्यांसाठी “ईकडे आड, तिकडे विहीर”
परिवहन मंत्री यांनी ३७६ कामगारांना निलंबीत केले.. दुसरीकडे संपाविरुद्ध आता न्यायालयात अवमान याचिकेवर सोमवारी सुनावणी…?

ठाणे (अंकुश पवार, सहसंपादक ठाणे, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर)

एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता गंभीर वळणावर येऊन ठेपला असून यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल झाली आहे. न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेऊन तातडीने कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतर देखील संप सुरूच असल्यामुळे अखेर एसटी महामंडळाने न्यायालयात संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात आणि कर्मचारी संघटनांविरोधात न्यायालय अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

संघटनांची भूमिका समजण्यापलीकडची आहे. शिवाय त्यांच्या या आडमुठय़ा भूमिकेमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत का, असेही न्यायालयाने संघटनांच्या भूमिकेवर ताशेरे ओढताना नमूद केले होते.

दरम्यान, एसटी कर्मचारी संघटनांच्या मागण्यांसंदर्भात आज दुपारी परवहन मंत्री अनिल परब यांच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीसाठी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधिंना आमंत्रित करण्यात आले असून त्यामध्ये या समस्येवर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची आणि त्याबाबतचा शासन आदेश काढण्याची मागणी सरकारकडून मान्य होऊनही एसटी कर्मचारी संघटनांनी संप सुरू ठेवल्याच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते.

तसेच संप मागे घेण्याच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा वारंवार अवमान करणाऱ्या संघटना किंवा कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची मुभा महामंडळाला दिली होती. समिती स्थापन करण्याबाबतचा शासन आदेश काढण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केली होती. तसेच ती पूर्ण झाल्यावर संप मागे घेण्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले होते. सरकारने त्यांचा शब्द पाळल्यानंतर मात्र शासन आदेश आपल्याला मान्य नसल्याचे सांगत संघटनांनी संप कायम ठेवण्याची भूमिका घेतली.

आता एस टी कामगारांचा पुढे काय करावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे,कारण परिवहन मंत्री अनिल परब,मानसिक त्रास देण्यात अग्रेसर आहेत,ते त्यांनी कर्मचाऱ्यांचे निलंबन करून सिद्ध केले आहे,कोर्टाने याचिका सोमवारी सकाळी सुनावणी होणार सांगितले आहे,त्यामुळे एस टी कामगारांचा संप चिघळला असून, पुढील संप नियोजन करून संयमाने पुढे नेण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here